छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती’ या टीव्ही रिअ‍ॅलिटीशोच्या १३ व्या पर्वामध्ये बुधवारी एका स्पर्धाने चुकीचं उत्तर दिल्याने त्याला थेट ९ लाख ३० हजारांचा फटका बसला. अमिताभ बच्चन यांच्यासोबत बुधवारी हॉट सीटवर बसलेल्या पुण्याच्या आकाश वाघमारेला २५ लाखांच्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. आकाश हा रोल ओव्हर स्पर्धक होता. आकाशने मंगळवारी १० हजार रुपये जिंकले होते. पुण्यामध्ये एक बांधकाम सुरु असणाऱ्या इमारतीमध्ये राहणाऱ्या आकाशने आज तीन लाख १० हजार रुपये अधिक जिंकत तीन लाख २० हजार जिंकले. महिन्याला ८ हजार रुपये कमवणाऱ्या २७ वर्षीय आकाशसाठी ही रक्कम फार असली तरी एका चुकीच्या उत्तरामुळे त्याला ९ लाख ३० हजारांचा फटका बसला आणि तो १२ लाख ५० हजारांवरुन ३ लाख २० हजारांवर आला.

नक्की वाचा >> महिना आठ हजार कमवणाऱ्या पुणेकर डिलिव्हरी बॉयसाठी अमिताभ स्वत: झाले डिलिव्हरी बॉय, दिली खास भेट

loksabha election 2024 Priority is given to local issues in the campaign in Marathwada
मराठवाड्यातील प्रचारात स्थानिक मुद्द्यांनाच प्राधान्य
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
sharad pawar latest news
राजकारणात महिलांना पतीच्या तालावर नाचावं लागतं? प्रश्न विचारताच शरद पवार म्हणाले, “फक्त पुरुषांतच कर्तृत्व…!”
ajit pawar and supriya sule
स्नुषाविरोधात प्रचार करण्यास नकार देण्याची एकनाथ खडसेंची भूमिका सुसंस्कृतपणाची;  खासदार सुप्रिया सुळे यांचा अजित पवार यांना चिमटा

एमएम पर्यंत शिक्षण घेतलेला आकाश हा सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. आकाशला त्याच्या वडीलांवर उपचार करायचे असून नवीन घरंही घ्यायचं आहे असं त्याने कार्यक्रमात सांगितलं. आकाशने मजल दर मजल करत १२ लाख ५० हजारांपर्यंत मजल मारली. मात्र १२ लाख ५० हजारांनंतर २५ लाखांच्या प्रश्नाचं उत्तर देताना तो चुकला आणि थेट ३ लाख २० हजारांवर आला. आकाशला कोणते प्रश्न विचारण्यात आलेले पाहुयात.

नक्की वाचा >> KBC 13: सात कोटींसाठी विचारण्यात आला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भातील ‘हा’ प्रश्न; देता आलं नाही उत्तर

रणवीर सिंहने हे गाणं असणाऱ्या चित्रपटामध्ये कोणती भूमिका साकारलीय? हा एक ऑडिओ प्रश्न होता आणि त्यासाठी खलिबली हे पद्मावत चित्रपटातील गाणं वाजवण्यात आलं होतं. या प्रश्नाचं बरोबर उथ्तर अल्लाउद्दीन खिलजी असं होतं. पुढच्या प्रश्नामध्ये पृथ्वीला उत्तर आणि दक्षिण गोलार्धात विभागणाऱ्या रेषेला काय म्हणतात असं विचारण्यात आलेलं. या प्रश्नाचं उत्तर प्रधान मध्याह्न रेषा असं होतं. पुढच्या प्रश्नात आकाशला हॉकी संघाचा भाग असणारे आणि कांस्यपदक जिंकणारे अशोक कुमार हे कोणत्या हॉकीपटूचे पुत्र आहेत असा प्रश्न विचारण्यात आलेला. या प्रश्नासाठी आकाशने ऑडियन्स पोल ही लाइफलाइन घेतली. या प्रश्नाचं उत्तर मेजर ध्यानचंद असं होतं.

महाभारतामध्ये शंतुन राजाने दत्त घेतल्यामुळे कोणत्या व्यक्तीला तिचं नाव मिळालं असा पुढचा प्रश्न आकाशला विचारण्यात आला. या प्रश्ननाचं उत्तर कृपी असं होतं. मात्र या प्रश्नाला आकाशने फ्लिप द क्वेश्न ही लाइफ लाइन वापरली. आकाशने भुगोलाशीसंबंधित प्रश्न आवडेल असं सांगितल्याने त्याला आकारमानानुसार जगातील दुसरा सर्वात मोठा खंड कोणता हा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर आफ्रिका असं होतं. हे उत्तर आकाशने बरोबर दिलं. महात्मा गांधीनी कोणत्या ठिकाणी दिलेल्या भाषणात करो या मरोचा नारा दिलेला असा पुढचा प्रश्न विचारण्यात आला असता आकाशने  ग्‍वालिया टँक मैदान, मुंबई असं बरोबर उत्तर देत ३ लाख २० हजार रुपये जिंकले. अमिताभ यांनी अगदी आनंदाने आकाशला ३ लाख २० हजारांचा चेक देत ही तुमच्या साडेतीन वर्षांच्या कमाई इतकं आहे असंही म्हटलं.

नक्की वाचा >> KBC 13: रेल्वेमंत्र्यांसंदर्भातील प्रश्नामुळे गमावले ९ लाख ३० हजार; तुम्हाला ‘या’ प्रश्नाचं उत्तर ठाऊक आहे का?

६ लाख ४० हजारांसाठी आकाशला पुढील चित्रात दाखवण्यात आलेली व्यक्ती कोण आहे असा प्रश्न विचारण्यात आला. यामध्ये १९९२ साली भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचं दाखवण्यात आल्याने आकाशने जे. आर. डी. टाटा असं उत्तर दिलं जे बरोबर आलं. त्यानंतर १२ लाख ५० हजारांच्या प्रश्नावं उत्तर देताना आकाशला दोन लाइप लाइन लागल्या. ५०-५० आणि एक्सपर्ट ओपिनियन या दोन्ही लाइफलाइन वापरुन बाकी तिघांपैकी कोण आधी देशाच्या संरक्षणमंत्री पदी विराजमान झालेलं. या प्रश्नासाठी मुलायम सिंग यादव, प्रणव मुखर्जी, अरुण जेटली आणि शरद पवार असे पर्याय देण्यात आलेले. ५०-५० नंतर मुलायम सिंग यादव आणि शरद पवार हे दोनच पर्याय शिल्लक राहिले. मात्र त्यानंतरही गोंधळ कायम असल्याने आकाशने एक्सपर्टची मदत घेत शरद पवार असं बरोबर उत्तर दिलं.

२५ लाखांचा प्रश्न आकाशला विचारण्यात आला. या प्रश्नाबद्दल संभ्रम कायम असतानाही आकाशने हिंमत करत मी उत्तर देणार म्हणत उत्तर दिलं मात्र ते चुकलं. २५ लाख मिळाले तर घराचं आणि इतर स्वप्नही पूर्ण होतील म्हणत आकाशने सौदी अरेबिया हे उत्तर दिलं ते चुकलं. मध्य आशियामधील कोणत्या देशाने अंतराळामध्ये पाठवलेलं होप या मंगळयान मोहिमेअंतर्गत येणाऱ्या यानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केलेला. या प्रश्नाचं उत्तर सौदी अरेबिया असं आकाशने दिलं मात्र हे यान पाठवणाऱ्या देशाचं नाव संयुक्त अरब अमिराती असं होतं. हे यान युएईने २०२० साली जून महिन्यात पाठवलं होतं.