KBC च्या मंचावर झळकणार ‘तारक मेहता’मधील कलाकार, जेठालाल आणि बापूजींचा धमाल व्हिडीओ पाहिलात का?

याचा एक प्रोमोशनल व्हिडीओ केबीसीच्या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि चर्चित शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती.’ या शोमुळे प्रेक्षकांचे फक्त मनोरंजन होत नसून त्यांच्या ज्ञानातही भर पडते. नुकतंच या शोमध्ये तारक मेहता का उलटा चश्मा या प्रसिद्ध मालिकेच्या टीमने हजेरी लावली. नुकतंच केबीसीने याबाबतचा एक प्रोमोशनल व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत जेठालाल आणि बापूजी हे दोघेही हॉटसीटवर बसलेले दिसत आहेत.

छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही लोकप्रिय मालिका आहे. ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून सगळ्यांचे मनोरंजन करत आहे. या शोमधल्या प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. नुकतंच या मालिकेच्या संपूर्ण टीमने केबीसीच्या १३ व्या पर्वात हजेरी लावली. यावेळी हॉटसीटवर जेठालाल म्हणजे दिलीप जोशी आणि अमित भट्ट म्हणजे बापूजी हे दोघे बसलेले दिसत आहे. याचा एक प्रोमोशनल व्हिडीओ केबीसीच्या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला.

केबीसीच्या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. यावेळी जेठालाल बापूजींकडे बघत अमिताभ बच्चन यांना विचारतात की, ‘तुम्ही अभिषेक बच्चनला ओरडता का?’ असा प्रश्न विचारतात. माझे वडिल मला कार्यक्रमादरम्यान नेहमी ओरडत असतात, असेही जेठालाल सांगतात. यावर बिग बी म्हणतात की, “हो जेव्हा अभिषेक लहान होता तेव्हा मी त्याला ओरडायचो. पण आता तो मोठा झाला आहे. त्यामुळे मी आता असं करत नाही.”

“पण तरीदेखील कधीतरी तुम्ही त्याला थोडेसे प्रेमाने ओरडत असाल ना की, आम्ही रागवलो आहे, तुम्ही असं करु नका,” असे जेठालाल म्हणतो. यानंतर बिग बी म्हणतात की, “तुमचे बापूजी तुमच्यावर ओरडतात का?” त्यावर जेठालाल म्हणतो की नाही, “बापूजी मला कधी ओरडत नाहीत.” यानंतर मालिकेतील काही क्लिप सुरु होतात. यात बापूजी जेठालालला ओरडताना दिसत आहे. त्यानंतर थोड्यावेळाने बापूजी पुन्हा मंचावर जेठालालला ओरडतात. हे सर्व पाहून सर्वजण जोरजोरात हसायला लागतात.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’ने काही दिवसांपूर्वी एक हजार एपिसोडचा टप्पा पूर्ण केला आहे. २००० सालामध्ये सुरु झालेल्या या शोचा सध्या १३वा सिझन सुरु आहे. या शोने एक हजार एपिसोड पूर्ण केले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kbc 13 taarak mehta ka ooltah chashmah actors leave amitabh bachchan in splits with their antics nrp

ताज्या बातम्या