“कंगनामुळे माझा फिटनेस ट्रेनर मला सोडून पळून गेला”, कपिल शर्माने केला खुलासा

कपिलले ‘कौन बनेगा करोडपती १३’ मध्ये हा खुलासा केला आहे.

kapil sharma, kangana ranaut,
कपिलले 'कौन बनेगा करोडपती १३' मध्ये हा खुलासा केला आहे.

माहितीचा स्त्रोत म्हणून छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’ पाहिला जातो. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन या शोचे सूत्रसंचालन करत आहेत. आता या शोचे १३ वे पर्व सुरु आहे. या शोमध्ये ‘शानदार फ्रायडे’ हा एपिसोड असतो. या दिवशी सेलिब्रिटी शोमध्ये हजेरी लावतात. यावेळी शोमध्ये बॉलिवूड अभिनेचा सोनू सूद आणि कॉमेडियन कपिल शर्मा यांनी हजेरी लावली होती. या दोघांनी अमिताभ यांच्याशी भरपूर गप्पा मारल्या आणि अनेक जुन्या आठवणी सांगितल्या.

यावेळी कपिलने गप्पामारत असताना बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौतचा उल्लेख केला आहे. कंगनामुळे त्याचा फिटनेस ट्रेनर त्याला सोडून कसा पळून गेला हे सांगितले. खरतरं जेव्हा सोनूने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली होती. तेव्हा त्याने कपिलला त्याच्या फिटनेसवर लक्ष द्यायला सांगितले होते. पण कपिलने त्याच्याकडे लक्ष दिले नाही.

आणखी वाचा : “तुम्ही लग्नाच्या पहिल्या रात्री काय केले?”; अभिनेत्रीने संतापून पत्रकारालाचा विचारला हा विचित्र प्रश्न

हे पाहिल्यानंतर सोनूने ठरवलं की कपिलला आता फिट बनवायचं. त्याने त्याच्या फिटनेस ट्रेनरला कपिलच्या मागे लाग आणि त्याला फिट बनव असे सांगितले. यावर कपिल म्हणाला, ‘त्याने दिलेल्या ट्रेनरने मला अजिबात सोडले नाही, पण एक दिवस त्याला कंगना रणौत क्लायंट म्हणून मिळाली. त्या दिवशी त्याने माझ्या छातीवर डंबेल सोडला आणि निघून गेला.

आणखी वाचा : “२०१४ पूर्वी कंगना हृतिक आणि आदित्य पांचोलीच्या ताब्यात होती…”, म्हणतं अभिनेत्याने उडवली खिल्ली

कपिलची ही गोष्ट ऐकल्यानंतर स्टुडिओमध्ये असलेल्या सगळ्या लोकांसोबत सोनू आणि अमिताभ हसू लागले. कपिलने शोमध्ये अमिताभ यांचे रिमझिम गिरे सावन हे गाणं गायलं. त्याने अमिताभ आणि शत्रुघ्न सिन्हा यांची अॅक्टिंग केली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kbc 13 when the gym trainer ran away from kapil sharma because of kangana ranaut dcp

ताज्या बातम्या