KBC 14 : न्यूज चॅनलनंतर आता बिग बींच्या निशाण्यावर Whatsapp युनिव्हर्सिटी, नवा प्रोमो व्हायरल

सध्या हा ‘कौन बनेगा करोडपती’ १४ चा नवा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

KBC 14 : न्यूज चॅनलनंतर आता बिग बींच्या निशाण्यावर Whatsapp युनिव्हर्सिटी, नवा प्रोमो व्हायरल
सध्या हा ‘कौन बनेगा करोडपती’ १४ चा नवा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

‘कौन बनेगा करोडपती’ या शोकडे प्रेक्षक माहितीचा स्त्रोत म्हणून पाहतात. गेल्या काही दिवसांपासून या शोच्या नव्या पर्वाची प्रेक्षक आतुरतेने प्रतिक्षा करत होते. या सगळ्यात ‘कौन बनेगा करोडपती’च्या १४ व्या पर्वाचा २ प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा प्रोमो सध्या व्हायरल झाला असून या प्रोमोमध्ये सोशल मीडियावरून मिळणारी बातमी किंवा माहिती ही नेहमीच योग्य नसते, असे म्हणतं सोशल मीडियावर चुकीची माहिती परसरवणाऱ्यांना अमिताभ यांना टोला लगावला आहे.

आणखी वाचा : “अचानक कोणी तरी कारची खिडकी ठोठावली अन्…”, बिग बींना ‘या’ बॉलिवूड कलाकाराने दिला सुखद धक्का

‘कौन बनेगा करोडपती’च्या १४ व्या पर्वाचे सुत्रसंचालन अमिताभ बच्चन करत आहेत. प्रोमोच्या सुरुवातीला अमिताभ हॉट सीटवर बसलेल्या एका स्पर्धकाला प्रश्न विचारतात की, यापैकी कोणत्या देशाने करोना काळात लोकांना घरात ठेवण्यासाठी रस्त्यावर ५०० वाघ सोडले होते? नेहमी प्रमाणे या प्रश्नासाठी देखील ४ ऑप्शन देण्यात आले. A) भारत, B) चीन, C) रशिया, D) यापैकी कोणतचा नाही स्पर्धेक असलेले ग्यानचंदजी बोलतात, रशिया त्यावर अमिताभ बच्चन म्हणतात की, भाऊ तुम्हाला इतकं ज्ञान कुठून मिळतं. तर ग्यानचंदजी लगेच सोशल मीडिया सर, मित्र आम्हाला शेअर करतात आणि आम्ही दुसऱ्यांना…यावर अमिताभ म्हणतात, हे चूकिचं उत्तर आहे. कारण बरोबर उत्तर हे D) यापैकी कोणताच नाही आहे.

आणखी वाचा : स्वप्नात ‘या’ जवळच्या व्यक्तींना पाहणे मानले जाते शुभ संकेत

आणखी वाचा : “मी एक स्त्री आहे पार्सल नाही…”, प्रेग्नेंसी न्यूजवर संतापली आलिया भट्ट

यावर ग्यानचंदजी बोलतात, पण सर हे तर फोटोसोबत सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. फॉर्वड करण्याआधी जर तुम्ही ती माहिती योग्य आहे का याची तपासणी केली असती तर असं झालं नसतं. अमिताभ पुढे म्हणतात, अमिताभ म्हणाले की, “आपण जे बघतो त्यावर पूर्णपणे विश्वास न ठेवता, आपण जे फॉर्वड करतो एकदा तपासून पाहा.” दरम्यान, हा व्हिडीओ शेअर करत एक नेटकरी म्हणाला, “मीडियानंतर आता Whatsapp युनिव्हर्सिटीवर केबीसी”, असे कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा : पापाराझींना कसं कळतं की सेलिब्रिटी कधी आणि कुठे असणार आहेत? मजेशीर व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने दिले उत्तर

‘कौन बनेगा करोडपती’ची ऑन एअर डेट अजून जाहिर झालेली नाहीये. मात्र, जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हा शो प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kbc 14 promo after false news show amitabh bachchan talks about whatsapp university kaun banega crorepati 14 goes viral dcp

Next Story
“आयुष्यात पहिल्यांदाच…”, अभिनेत्री स्पृहा जोशीने सांगितला वारीचा अनुभव
फोटो गॅलरी