scorecardresearch

“जात…जात नाही तोवर…”, केदार शिंदे यांनी ‘झुंड’ चित्रपटावरुन केलेले ट्वीट चर्चेत

या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले तर मुख्य भूमिकेत अमिताभ बच्चन आहेत.

kedar shinde, amitabh bachchan, nagraj manjule, jhund,
या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले तर मुख्य भूमिकेत अमिताभ बच्चन आहेत.

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘झुंड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर चित्रपटाचं कौतुक केलं आहे. यात दिग्दर्शक केदार शिंदे यांनी शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

केदार शिंदे यांनी त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून हे ट्वीट केलं आहे. हे ट्वीट करत केदार शिंदे म्हणाले, “जात.. जात नाही तोवर माणूस म्हणवून घ्यायची आपली लायकी नाही. म्हणून ‘झुंड’ हा चित्रपट पाहा.” केदार शिंदे यांनी केलेलं हे ट्वीट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

आणखी वाचा : “पहिल्यांदा किस करताना मला…”, गिरिजा ओकने सांगितला कॉलेजमधला ‘तो’ विचित्र अनुभव

आणखी वाचा : टप्पूसोबत बाल विवाह करणारी टिना, पाहा आता कशी दिसते

दरम्यान, ‘झुंड’ हा चित्रपट स्लमसॉकरचे संस्थापक विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ हा चित्रपट ४ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे. तर हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु यांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kedar shinde tweet on amitabh bachchan and nagraj manjule jhund movie dcp

ताज्या बातम्या