केरळ उच्च न्यायालयाने मल्याळी अभिनेत्री भावना मेननला (Malayalam actress Bhawna Menon) मारहाण झाल्याच्या प्रकरणामध्ये राज्य सरकारने दाखल केलेली याचिका स्वीकारलीय. ही याचिका दाखल करुन घेण्यात आल्यानंतर तीन साक्षीदारांचा जबाब पुन्हा नोंदवण्यात येणार आहे. तसेच पाच नवीन साक्षीदारांचा जबाब नोंदवून घेण्यास सांगण्यात आलंय. या प्रकरणामध्ये कनिष्ठ न्यायालयाने साक्षीदारांची पुन्हा चौकशी केली जावी, जबाब नोंदवावा यासंदर्भातील याचिका फेटाळली होती. याच निर्णयाला उच्च न्यायालयामध्ये (Kerala High Court) राज्य सरकारकडून आव्हान देण्यात आलं होतं.

या प्रकरणामध्ये दाक्षिणात्य चित्रपटांमधील मोठं नाव असणाऱ्या गोपालकृष्णन् पद्मनाभ म्हणजेच दिलीप (Actor Dileep) नावाने ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्याचं नाव आरोपी म्हणून असल्याने त्याच्या अडचणी वाढण्याची चिन्हं दिसत आहेत. केरळ उच्च न्यायालयाने ही यचिका स्वीकारल्याने आता या प्रकरणाकडे देशभरातील प्रसारमाध्यमांचं लक्ष वेधलं गेलं आहे.

Baramati Namo Maharojgar Melava
निमंत्रण पत्रिकेतील आणखी एक घोळ सुधारण्यासाठी प्रशासनाची धावाधाव
devendra fadanvis
उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी; चित्रफीत शेअर करणाऱ्याला अटक
Kangana Ranaut
चित्रपटसृष्टीने आपल्याला अनेकदा अपमानित केले, कंगना राणावतचा न्यायालयात दावा
Yash Mittal Murder Noida
व्यावसायिकाच्या मुलाची चार मित्रांकडून हत्या; वडिलांकडून मागितली सहा कोटींची खंडणी

सन २०१७ साली अभिनेत्री भावना सोबत धावत्या गाडीमध्ये लैंगिक अत्याचार करण्यात आल्याच्या घटनेमुळे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणामध्ये केरळ पोलिसांची गुन्हे शाखा अजूनही तपास करत आहे. याच तपासासंदर्भात सध्या नवे नवे खुलासे होताना दिसत आहेत. मागील आठवड्यामध्ये राज्यातील पोलीस विभागाने या प्रकरणामध्ये अभिनेता दिलीप आणि पाच लोकांविरोधात नव्याने गुन्हा दाखल केला.

दिलीप आणि इतर लोकांनी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. काही काळापूर्वीच निर्देशक बालचंद्र कुमार यांनी लैंगिक अत्याचारांच्या घटनांसदर्भात धक्कादायक खुलासे केल्यानंतर आता हे पाच वर्षांपूर्वीचं प्रकरण पुन्हा नव्याने चर्चेत आलंय.

बालचंद्र कुमार यांनी केलेल्या खुलाश्यानंतर अभिनेत्रीने केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना पत्र लिहून विनंती केली होती. आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी या भावनाने या पत्रामधून केली होती. या पत्रामधून संपूर्ण प्रकरण काय आहे हे सांगतानाच आपल्या वेदना भावनाने सांगितल्या होत्या. या प्रकरणामधील आरोपींचा चौकशी होणं गरजेचं आहे. मला न्याय हवाय, असं भावनाने पत्रात म्हटलेलं.

१७ फेब्रुवारी २०१७ रोजी मल्याळी अभिनेत्री चित्रिकरणावरुन घरी येत असताना काही लोकांनी रस्त्यामध्येच तिचं अपहरण केलं. त्यानंतर तिचा लैंगिक छळ करण्यात आला. या सर्व प्रकरणामध्ये अभिनेता दिलीपचा हात असल्याचा दावा केला जातोय. भावनाने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणामध्ये याचिका दाखल केलीय.

पाच वर्षांपासून या प्रकरणाबद्दल कुठेही वाच्यता न करणाऱ्या भावनाने आता या प्रकरणाबद्दल धक्कादायक दावे केलेत. एक नोट शेअऱ करत भावनाने मागील बऱ्याच काळापासून आपण या तणावाखाली जगत होते. मला हिणवण्याची आणि शांत राहण्यासाठी अनेक प्रलोभनं दाखवण्यात आली, अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र यामध्ये आपली काही चूक नसताना आपण बोलण्याचा निर्णय घेतल्याचं अभिनेत्रीने सांगितलं आहे.

भावानाने या प्रकरणाचा खुलासा केल्यानंतर तिला अनेक सेलिब्रिटींपासून ते चाहत्यांपर्यंत सर्वांनीच पाठिंबा दिल्याचं चित्र पहायला मिळत आहे.