छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम म्हणून ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाकडे पाहिलं जातं. ‘बिग बॉस मराठी’ हा शो लोकप्रिय शोपैकी एक आहे.‘बिग बॉस मराठी’चे तीनही पर्व चांगलेच गाजले होते. बिग बॉसच्या स्पर्धकांमधील राडे, नवनवीन टास्क, मैत्री आणि होणारे वाद यामुळे हा शो कायमच चर्चेत राहिला आहे. बिग बॉसचे तीनही पर्व हिट ठरल्यानंतर आता लवकरच चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पर्वात अभिनेत्री केतकी चितळे सहभागी होणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र नुकतंच तिने याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.

बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर आता या पर्वात कोणकोणते कलाकार सहभागी होणार याची चर्चा सुरु आहे. यात बिग बॉसच्या घरात सहभागी होणाऱ्यांमध्ये केतकी चितळेच्या नावाची चर्चा सुरु होती. या पर्वासाठी तिला विचारणा झाल्याचेही समोर आलं होतं. मात्र नुकतंच तिने आपल्याला कोणतीही विचारणा झाली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच ही अफवा असल्याचेही सांगितलं आहे.

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र

Bigg Boss Marathi 4 : ‘या’ प्रसिद्ध कलाकारांनी ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होण्यास दिला नकार, कारणही दिले फारच खास

याबाबत केतकीने एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली होती. तिने नुकतंच तिची ही पोस्ट रिपोस्ट केली आहे. त्यात ती म्हणाली, “बरोबर एका वर्षापूर्वी मी एक पोस्ट करत माझे विचार स्पष्ट मांडले होते. मी ‘बिग बॉस सारख्या कार्यक्रमांना पाठिंबा देत नाही असं मी त्यात स्पष्ट लिहिलं होतं.”

“तसेच अशा नकारात्मकता पसरवणाऱ्या कार्यक्रमाचे मी समर्थन करत नाही. अशा माणसांवर प्रयोग करणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणं म्हणजे मी माझा दर्जा कमी करुन घेणं आहे आणि अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन मी माझी किंमत मुळीच कमी करुन घेणार नाही. मी पैशासाठी माझा दर्जा कमी करू शकत नाही.

“मला महेश मांजरेकर आणि…” ‘बिग बॉस मराठी’च्या सूत्रसंचालनाबद्दल प्रश्नावर सिद्धार्थ जाधवचा खुलासा

“आपल्याकडे अशी सुविधा असती तर किती छान झालं असतं. ज्यांनी मला प्रत्येक वेळीला ‘बिग बॉस’ बद्दल विचारलंय त्यांनी एपिलेप्सीच्या संशोधनासाठी १ रुपया दान करावा आणि वृत्त माध्यमांनी विशेषत: बिग बॉस संदर्भात माझं नाव छापल्यावर प्रत्येकवेळी एक हजार रुपये दान करावेत”, असेही तिने म्हटले आहे.

दरम्यान बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा टीझर समोर येताच याबद्दल उत्सुकता पाहायला मिळत आहे. यंदाच्या या पर्वात बिग बॉसच्या घरात नेमकं कोण-कोण दिसणार याची चर्चा सुरू झाली आहे. पण पहिल्या तिन्ही पर्वांपेक्षा वेगळा असणार असल्याचे दिसत आहे. पण आता त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन होणार असल्याचे दिसत आहे. तसेच यात सहभागी होणारे स्पर्धक कोण असणार याबद्दल उत्सुकता पाहायला मिळत आहे.