सध्या महाराष्ट्रात केतकी चितळेच्या फेसबुक पोस्टचा मुद्दा बराच गाजताना दिसत आहे. केतकी चितळेनं तिच्या फेसबुक पेजवरून आक्षेपार्ह पोस्ट लिहून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर विखारी टीका केली. या प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यानंतर ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं केतकी चितळे हिला कळंबोली येथील राहत्या घरातून अटक करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणावर अभिनेत्री सविता मालपेकर आणि मानसी नाईक यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केतकी चितळेच्या आक्षेपार्ह पोस्टबद्दल टीव्ही ९ शी बोलताना सविता मालपेकर म्हणाल्या, “तिची पोस्ट वाचल्यानंतर आणि ऐकल्यानंतर माझा संताप होत आहे. मी एक कलाकार म्हणून सांगतेय आणि राष्ट्रवादीची सांस्कृतीक सेलची प्रदेश सरचिटणीस म्हणून मी तिला सांगू इच्छिते याच्यापुढे जर तू असं काही बोललीस आणि जे बोलली आहेस ते शब्द जर मागे घेतले नाहीस आणि पवार साहेबांची माफी मागितली नाहीस तर तू जिथे कुठे असशील तिथून तुला शोधून काढून पवार साहेबांच्या पायापर्यंत आणलं नाही ना तर नावाची सविता मालपेकर नाही. हे लक्षात ठेव.”

आणखी वाचा- पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे महेश बाबू ट्रोल, युजर्स म्हणाले; “बॉलिवूडला परवडणार नाही पण…”

याशिवाय अभिनेत्री मानसी नाईकनेही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, “आपण मराठी आहोत आणि मराठी माणसाने अशाप्रकारे कोणाबाबतही असं बोलणं खरं तर लज्जास्पद आहे. मला ती जे बोलली ती अजिबात आवडलेलं नाही आणि शरद पवार यांच्याबद्दल अशाप्रकारचा काही विचार करण्याआधीही दोन वेळा विचार केला पाहिजे आणि केतकीने जे काही केलं ते बरोबर नाही. असं कोणीच करूही नये. त्यासाठी जो कोणी असं करेल त्याला कठोर शिक्षा व्हायला हवी जेणेकरून पुन्हा असं काही बोलताना कोणतीही व्यक्ती विचार करेल. वडिलधाऱ्या लोकांबद्दल तर असं बोलणं चुकीचंच आहे.”

आणखी वाचा- बॉलिवूड स्टार किड्स पुन्हा कंगनाच्या निशाण्यावर! म्हणाली, “ते सगळे उकडलेल्या अंड्यांसारखे…”

दरम्यान केतकी चितळेच्या आक्षेपार्ह पोस्टमुळे सध्या महाराष्ट्रातील राजकारण तापलंय. शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषेतील या पोस्ट प्रकरणावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय नेत्यांसोबतच सोशल मीडियावर अनेक युजर्सनी देखील केतकी चितळेवर टीका केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ketaki chitale offensive facebook post about sharad pawar savita malpekar and mansi naik reacts on it mrj
First published on: 16-05-2022 at 15:24 IST