यंदाच्या वर्षीचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत चित्रपट म्हणजे ‘KGF Chapter 2’. गेल्या ३ वर्षांपासून प्रेक्षक सुपरस्टार यशच्या या चित्रपटाची प्रतिक्षा करत आहेत. आता हा चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटील येणार आहे. ‘KGF Chapter 2’ चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यावेळी चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांना आनंदाचा धक्का दिला आहे. हा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
यशच्या या चित्रपटाचा ट्रेलर खूपच दमदार आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला एक प्रश्न विचारला आहे- ‘केजीएफमध्ये गरूडला मारल्यानंतर काय झाले? वाचाल का?’ त्यानंतर पुढे म्हटले आहे- ‘ ‘खून से लिखी हुई कहानी है ये… स्याही से नहीं बढ़ेगी. अगर आगे बढ़ाना है, तो फिर से खून ही मांगेगी…’ ट्रेलरमध्ये अभिनेते प्रकाश राज हे बोलताना दिसत आहेत.
त्यानंतर प्रत्येक दमदार अशा डायलॉगनंतर प्रत्येक कलाकाराची एण्ट्री दाखवली आहे. देयर विल बी नो मोर टोलरेंस (There will be no tolerance) या डायलॉग नंतर रवीना टंडनची एण्ट्री होते. रवीनाच्या एण्ट्रीनंतर चित्रपटातील खलनायक म्हणजे संजय दत्तची एण्ट्री ही ‘तलवार चलाकर, खून बहाकर जंग लड़ना तबाही नहीं, तरक्की होती है. उसमें लाशें भी बेकार नहीं जाती. चाहिए तो गिद्धों से पूछ ले,’ या डायलॉगने होते.
आणखी वाचा : या चित्रात तुम्ही सगळ्यात आधी काय पाहिले? यावरून कळेल तुमचे व्यक्तीमत्त्व
त्यानंतर आपल्या सगळ्यांचा आवडता रॉकी भाईची एण्ट्री ‘वायलेंस.. वायलेंस.. वायलेंस, आई डोंट लाइक इट. आई अवॉइड… बट वायलेंस लाइक मी, आई कान्ट अवॉइड,’ या डायलॉगने होते. चित्रपटातील यशचा लूक प्रेक्षकांना प्रचंड आवडतं आहे. KGF प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक ‘KGF Chapter 2’ या चित्रपटाची प्रतिक्षा करत होते. पण आता त्यांच्या प्रतिक्षेचा अंत झाला आहे. हा चित्रपट १४ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.