अभिनेता आर. माधवन अनेक विषयांवर स्पष्टपणे त्याचं मत मांडत असतो. नुकतंच त्याने लाल सिंग चड्ढा चित्रपट फ्लॉप झाला, त्याबद्दल प्रतिक्रिया दिली. यावेळी त्याने बॉलिवूड चित्रपट फ्लॉप होण्याचं आणि दाक्षिणात्य चित्रपट सुपरहिट होण्यामागची काही कारणंही माधवनने सांगितली. माधवन बुधवारी मुंबईत त्याच्या आगामी ‘धोखा – राऊंड डी कॉर्नर’ या चित्रपटाच्या टीझर लॉन्च प्रसंगी उपस्थित होता. यावेळी त्याने आतापर्यंत फक्त सहाच दाक्षिणात्य चित्रपटांनी चांगली कामगिरी केली असल्याचं वक्तव्य केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “आपण चुकीचा चित्रपट…”; बॉयकॉट ट्रेंडनंतर ‘लाल सिंग चड्ढा’ फ्लॉप झाल्याबद्दल आर. माधवनने मांडलं स्पष्ट मत

दाक्षिणात्य चित्रपट हिट होण्याबद्दल माधवन म्हणाला, “काही मोजक्याच दाक्षिणात्य चित्रपटांच्या यशानंतर हिंदी चित्रपटांपेक्षा दाक्षिणात्य चित्रपट चांगले काम करतात, असा विचार करणे चुकीचे आहे. साऊथ इंडस्ट्रीतील मोजकेच चित्रपट आतापर्यंत सुपरहिट ठरले आहेत. तसेच याला पॅटर्न देखील म्हणता येणार नाही. कारण बाहुबली १, बाहुबली २, आरआरआर, पुष्पा, केजीएफ: भाग १ आणि केजीएफ: भाग २ हे फक्त सहा सुपरहिट चित्रपट आहेत, त्यामुळे त्याला आपण ट्रेंड म्हणू शकत नाही. चांगले चित्रपट आले तर ते नक्कीच हिट होतील, मग ते कोणत्याही भाषेतले असो.” प्रेक्षकांना चांगला कंटेंट दिल्यास ते सिनेमागृहात जाऊन कोणत्याही भाषेची पर्वा न करता सिनेमा पाहतील, असा विश्वास माधवनने व्यक्त केला.

हेही वाचा – ‘लाल सिंग चड्ढा’च्या वितरकांना आमिर खान नुकसान भरपाई देणार?, सत्य आलं समोर

माधवनने हिंदी चित्रपटांच्या फ्लॉपचे श्रेय करोना नंतरच्या काळात प्रेक्षकांच्या बदललेल्या पसंतींना दिले. “करोनानंतर, लोकांच्या आवडीनिवडी बदलल्या आहेत. त्यामुळे लोक ज्या प्रकारचे चित्रपट पाहतील, तसेच चित्रपट आपल्याला बनवावे लागतील. आपल्याला आणखी थोडे प्रगतीशील बनावे लागणार आहे,” असं तो म्हणाला.

दरम्यान, माधवन कुकी गुलाटी दिग्दर्शित ‘धोखा – राऊंड डी कॉर्नर’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट २३ सप्टेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kgf bahubali only six south movies were superhit says r madhvan after laal singh chaddha flops hrc
First published on: 18-08-2022 at 12:03 IST