बहुप्रतिक्षित ‘केजीएफ चॅप्टर २’ चित्रपट प्रदर्शित झाला अन् बॉक्सऑफिसवर या चित्रपटाने धुमाकूळ घातला. चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा उलटून गेला असला तरी या चित्रपटाची क्रेझ काही कमी झालेली नाही. तसेच या चित्रपटामधील कलाकारांना देखील प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उलचून धरलंय. इतकंच नव्हे तर कलाकार देखील चित्रपटाला मिळालेलं य़श एण्जॉय करताना दिसत आहेत. ‘केजीएफ चॅप्टर २’मध्ये मुख्य भूमिकेत असलेल्या अभिनेता यशने पत्नी राधिका पंडितबरोबर चित्रपटाच्या सक्सेस पार्टीचा मनसोक्त आनंद लुटला.


याच पार्टीदरम्यानचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. यश आणि राधिकाच्या देखील रोमँटिक अंदाजातील फोटोला चाहत्यांची भलतीच पसंती मिळताना दिसत आहे. राधिकाने या पार्टीदरम्यानचे फोटो तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये हे बहुचर्चित कपल भलंतच गोड दिसतंय.


राधिकाने यशबरोबर फोटो शेअर करताच काही तासांमध्येच नेटकऱ्यांनी तिच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. चित्रपटाच्या सक्सेस पार्टीसाठी यश-राधिकाने एकाच रंगाचे कपडे परिधान केलेले दिसत आहेत. त्याचबरोबरीने या दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद विशेष लक्ष वेधून घेत आहे. यश-राधिका नेहमीच सोशल मीडिया अकाऊंटद्वारे फोटो शेअर करत एकमेकांप्रती असणारं प्रेम व्यक्त करताना दिसतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.


समुद्र किनारी ‘के’जीएफ २’च्या सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. दिग्दर्शक प्रशांत नील यांनी देखील यश-राधिकाबरोबर फोटो काढत पार्टीचा आनंद लुटला. ‘केजीएफ २’ बॉक्सऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहे. या चित्रपटामध्ये यशबरोबरच श्रीनिधी शेट्टी, बॉलिवूड कलाकार संजय दत्त, रवीना टंडन यांनी देखील कौतुकास्पद काम केलं आहे. चित्रपटामध्ये संजय आणि रवीनाने साकारलेल्या भूमिकांना देखील प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहेत.