Yash Dance Viral : अभिनेता यशला ‘केजीएफ’ या चित्रपटामुळे एक वेगळी ओळख मिळाली. या चित्रपटातील ‘रॉकी भाई’ या त्याच्या पात्राला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. यशचे जगभरात अनेक चाहते आहेत. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. ‘केजीएफ’ आणि ‘केजीएफ २’ या चित्रपटांमुळे यश खऱ्या अर्थाने सुपरस्टार झाला. त्याच्या कामाबरोबरच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत असतो.

यश (Yash) विविध सण-समारंभ साजरे करताना आपल्या पत्नी आणि मुलांसह फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असतो. यशने नुकतंच दिवाळी साजरी करतानाचे फोटो शेअर केले होते. आता यशच्या पत्नीने त्यांचा मुलगा यथार्वच्या वाढदिवसाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात यश त्याच्या मुलीसह डान्स करताना दिसत आहे.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
Video : konkani young guy dance so gracefully
“आपली संस्कृती दाखवायला लाजायचं नाही!” कोकणी तरुणाने केला भन्नाट डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच
Gani Bavari Viral Video
‘डान्स असावा तर असा…’ ‘घनी बावरी’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक
Mrunal Thakur Comment on Diwali Edited Video
Mrunal Thakur Comment: “त्याचे प्रत्येक अभिनेत्रीबरोबर व्हिडीओ, माझं तर मन…”, चाहत्याचे एडिटेड व्हिडीओ पाहून मृणाल ठाकूरची खोचक टिप्पणी
marathi actress vishakha subhedar dance with niece watch video
Video: “तुमचा वारसा ही पुढे चालवणार”, विशाखा सुभेदारचा भाचीबरोबरचा जबरदस्त डान्स पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले…
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट

हेही वाचा…गोविंदाने साजरी केली नाही यंदाची दिवाळी, कारण सांगत पत्नी सुनीता आहुजा म्हणाली…

लेकीसह यशचा डान्स झाला व्हायरल

यशने नुकताच त्याच्या मुलाचा वाढदिवस साजरा केला. याच कार्यक्रमात ‘टगारु बांथू टगारु’ हे कन्नड गाणं लागलं आणि यश डान्स करायला लागला. त्या डान्सचा व्हिडीओ यशच्या पत्नीने सोशल मीडियावर शेअर करीत एक कॅप्शन दिली. त्यात यशची पत्नी राधिका पंडित लिहिते, “डॅडा- असं नाच की कोणीच बघत नाहीये… , आयरा– डॅडा असं नाच की कोणीच बघत नाहीये.” म्हणजेच यश त्याची मुलगी आयराला डान्स करण्यासाठी तुझ्याकडे कोणीच बघत नाहीये, असं समजून नृत्य करायला सांगत आहे; तर यशची मुलगी त्याला असाच संदेश देत आहे.

यशच्या डान्स स्टेप्स

‘टगारु बांथू टगारु’ गाण्यावर यशने ब्रेक डान्स आणि इतर स्टेप्स करीत उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. यश डान्स करत असताना त्याची मुलगीही त्याच्या जवळ उभी होती. डान्स करत असताना यश त्याच्या मुलीजवळ गेला आणि तिच्यासमोर काही डान्स स्टेप्स करत तिला त्यानं जवळ घेतलं. त्यानंतर यश पुन्हा नाचत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. याच व्हिडीओत यशसह त्याची मुलगीसुद्धा नाचायला लागते.

हेही वाचा…कार्तिक आर्यन मिस्ट्री गर्लला करतोय डेट. भर शोमध्ये विद्या बालनने केली पोलखोल; म्हणाली, “फोनवर बोलताना…”

रामायण सिनेमात यश दिसणार रणबीर कपूरबरोबर मुख्य भूमिकेत

‘दंगल’फेम दिग्दर्शक नितेश तिवारी ‘रामायण’ हा सिनेमा तयार करीत आहेत. या सिनेमात अभिनेता रणबीर कपूर प्रभू रामाची भूमिका करीत आहे; तर दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. याच सिनेमात यश रावणाच्या भूमिकेत दिसणार असून, हा सिनेमा २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader