‘केजीएफ’ चित्रपट फेम अभिनेता यश व त्याची पत्नी राधिका पंडित यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. बेंगळुरूतील खासगी रुग्णालयात राधिकाने मुलाला जन्म दिला. यश दुसऱ्यांदा बाबा झाल्याने सोशल मीडियावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
यश व राधिकाला दहा महिन्यांची मुलगी आहे. आयरा असं तिचं नाव असून यश सोशल मीडियावर तिचे फोटो व व्हिडीओ पोस्ट करत असतो. २ डिसेंबर २०१८ रोजी राधिकाने मुलीला जन्म दिला. दोन दिवसांपूर्वीच मुलीसोबत दिवाळीच्या शुभेच्छा देतानाचा व्हिडीओ यशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला होता.
‘केजीएफ: चॅप्टर वन.’ या चित्रपटाने दक्षिणेकडेच नव्हे तर संपूर्ण देशभरात अक्षरश: धुमाकूळच घातला होता. या चित्रपटातील कलाकार यशला तर चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले होते. ‘केजीएफ: चॅप्टर वन’ हा १९८०च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळातील पीरियड ड्रामा असून एका अनाथ माणसाची कथा आहे. अप्रतिम अभिनय, सुंदर दृश्ये आणि मनोरंजक कथेच्या संगमामुळे या चित्रपटाने चाहत्यांच्या मनावर राज्य केले होते. यशचा ‘केजीएफ: चॅप्टर टू’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे समोर आले आहे.