छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो पैकी एक म्हणजे खतरों के खिलाडी. या शोमध्ये लोकप्रिय कलाकार येऊन खतरनाक स्टंटस् परफॉर्म करताना दिसतात. बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक, निवेदक रोहित शेट्टीच्या या शोने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. ‘खतरों के खिलाडी ‘ चा महाअंतिम सोहळा रविवारी दणक्यात पार पडला. या सिझनच्या विजेतेपदावर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आणि होस्ट अर्जुन बिजलानीने त्याचे नावं कोरले आहे. ट्रॉफी सह त्याला एक आलिशान कार आणि २० लाख रुपयाची धनराशी, बक्षीस म्हणून देण्यात आली आहे. तर अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी या सिझनची रनरअप आणि अभिनेता विशाल आदित्य सिंह सेकंड रनरअप ठरला आहे.

अर्जुन, दिव्यांका आणि विशाल मध्ये तंगडी स्पर्धा रंगली होती. महाअंतिम फेरीत शेवटच्या स्टंटमध्ये अर्जुन दिव्यांकापेक्षा फक्त २० सेकंड पुढे असल्या कारणाने तो या सिझनचा विजेता ठरला आहे. अर्जुनने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या अविस्मरणीय सोहळ्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. यात शोचा होस्ट रोहती शेट्टी मध्ये उभा राहिला असून एका बाजूला अर्जुन तर दुसऱ्या बाजूला दिव्यांका उभी राहिली आहे आणि रोहीत अर्जुन बिजलानीला या सिझनचा विजेता म्हणून घोषित करताना दिसत आहे. या व्हिडीओत तो कीती खुश झाला आहे ते पाहायला मिळते आहे. तसंच दिव्यांका देखील अर्जुन साठी खूश असल्याचे पाहायला मिळाले. अर्जुनने हा व्हिडीओ पोस्ट करुन,” जिंकण आणि हारणं सुरूचं असतं, परंतु शो मधील प्रवास सर्वात महत्वाचा आहे. आम्ही सर्वांनीचं खतरों के खिलाडी मध्ये मजा केली आहे”, अशा अश्याचे मोठे कॅप्शन देत सर्वांचे आभार मानले आहेत.

अर्जुन आणि दिव्यांका सोबत टॉप ५ च्या यादीत श्वेता तिवारी, वरुण सूदआणि विशाल आद‍ित्य सिंह सामील होते. सर्वांनीच उत्तम स्टंट परफॉर्म केले आहेत, मात्र अर्जुनने खतरो के खिलाडीच्या सिझन ११ ची ट्रॉफी जिंकली आहे. दरम्यान, अर्जुन बिजलानीने खतरो केखिलाडी ची ट्रॉफी जिंकल्यानंतर कुटुंबीय आनंद व्यक्त करत आहेत. अर्जुनच्या पत्नीने आनंद साजरा करण्यासाठी पार्टीचे नियोजन केले होते. त्या पार्टीमधील काही फोटो त्याच्या पत्नीने इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला ठेवले होते. हे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चर्चेत आहेत. अनेकांनी अर्जुनला शुभेच्छा दिल्या आहेत. अर्जुनने ‘इश्क मे मरजावा’, ‘नागिन’, ‘परदेस मे है मेरा दिल’, ‘डान्स दिवाने’ या शोमधून अनेकांची मने जिंकली होती.