‘खतरों के खिलाडी’ मधील स्पर्धक अनुष्का सेनला करोनाची लागण

सुरक्षेच्या दृष्टीने अनुष्काला क्वारंटाइन करण्यात आलंय.

anushka-sen
(photo-instagram@anushkasen0408)

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय शो ‘खतरों के खिलाडी’ चा अकरावा सिझन चांगलाच चर्चेत आहे. या शोचा होस्ट बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीसह संपूर्ण शोची टीम दक्षिण अफ्रेकेतील केप टाउनमध्ये शूटिंगसाठी गेली आहे. या शोसंबंधीत वेगवेगळ्या घडामोडी रोज समोर येत आहेत. मात्र यातच आता एक मोठी बातमी हाती आलीय. ती म्हणजे या शोमधील स्पर्धक अनुष्का सेनला करोनाची लागण झालीय. अनुष्काच्या करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

अनुष्काला करोनाची लागण झाली असली तरी तिच्यात करोनाची कोणतीही लक्षणं आढळून आलेली नाही. सर्व स्पर्धकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अनुष्काला क्वारंटाइन करण्यात आलंय. मात्र यामुळे आता शोच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झालीय. स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार अनुष्काची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्व स्पर्धक तसंच शोसंबंधीत सर्व क्रू मेंबर्सची करोना चाचणी करण्यात आली असून सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anushka Sen (@anushkasen0408)

हे देखील वाचा: तापसी पन्नूची रशिया ट्रिप; मॉस्कोतील हॉटेलमध्ये तापसीचा भारतीय लूक

गेल्या काही दिवसांपासूनच केप टाउनमध्ये ‘खतरों के खिलाडी’ शोच्या शूटिंगला सुरुवात झालीय. या शोमध्ये टेलिव्हजनवरील अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींनी सहभाग घेतला आहे. यात अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी, श्वेता तिवारी, राहुल वैद्य, वरुण सूद,अभिनव शुक्ला, सौरभ राज जैन आणि निक्की तांबोळी अशा अनेकांची नाव आहेत.

तर काही दिवसांपूर्वीच कलर्स वाहिनीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या शोचा एक प्रोमो शेअर करण्यात आला होता. या प्रोमोमध्ये एका जीपमध्ये रोहित शेट्टी बसताना दिसतोय. रोहितच्या शेजारीच एक चित्ता बसलेला पाहायला मिळतोय. हा थरारक प्रोमो पाहूनच प्रेक्षकांमध्ये शओबद्दल उत्सुकता निर्माण झालीय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Khatron ke khiladi contestant anushka sen tested corona positive in south africa kpw

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या