Khichdi season 3 review: लोकांना आवडली का ही नवीन ‘खिचडी’

२००२ मध्ये या मालिकेचा पहिला सिझन प्रदर्शित करण्यात आला होता. नुकताच या मालिकेचा तिसरा सिझन भाग १४ एप्रिलला प्रदर्शित झाला.

टेलिव्हिजन विश्वात काही कार्यक्रमांनी प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडली होती. छोट्या पडद्यावर प्रदर्शित झालेल्या काही मालिका बंद होऊन इतकी वर्षे उलटली तरी अजूनही त्यातील पात्र, मालिकेचे कथानक, शीर्षक गीत या साऱ्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात कायम जाग्या असल्याचे बऱ्याचदा पाहायला मिळाले आहे. अशाच मालिकांच्या गर्दीतील एक उदाहरण म्हणजे, ‘खिचडी’. हा कार्यक्रम नव्या अंदाजात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला.

२००२ मध्ये या मालिकेचा पहिला सिझन प्रदर्शित करण्यात आला होता. नुकताच या मालिकेचा तिसरा सिझन भाग १४ एप्रिलला प्रदर्शित झाला. प्रेक्षकांना तिसऱ्यांदा वाढलेली खिचडीही तेवढी पसंत पडली. प्रेक्षकांच्या आग्रहासाठी इस्टंट खिचडी या नावाने ही मालिका पुन्हा एकदा सुरू करण्यात आली होती. या दोन्ही सिझनच्या यशानंतर मालिकेच्या निर्मात्यांनी याच टीमला घेऊन सिनेमा काढण्याचे ठरवले. खिचडी- द मुव्ही असे या सिनेमाचे नाव होते. या सिनेमानेही बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली होती. १४ एप्रिलला तिसऱ्या सिझनच्या पहिल्या भाग लोकांना भरभरून आवडला. सोशल मीडियावर या मालिकेचे अनेकांनी कौतुक केले.

तर काहींनी या मालिकेची तुलना कपिल शर्माच्या फॅमिली टाइम विथ कपिल या शोसोबत केली. एका ट्विटर युझरने लिहिले की, ‘कपिलच्या शोपेक्षा कितीतरी पटीने ही मालिका चांगली आहे. तुमचे आभार की तुम्ही परत आलात.’ अनेकांनी हंसा आणि प्रफुलची विनोदी जोडी खूप वर्षांनी पुन्हा एकदा पाहिल्याचे अभिनंदन केले. एका युझरने लिहिले की, ‘खिचडी मालिका परत आलीये. खूप दिवसांनी टीव्हीवर पाहण्यासारखं काही तरी आलं. माझे शनिवार रविवार फिक्स झाले.’

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Khichdi season 3 review praful hansa crack jokes and audience full enjoying the show khichdi heres the review