kiara advani got trolled for her dress at karan johar party | "तुझी पँट कुठे आहे?" कियारा आडवाणीच्या शॉर्ट ड्रेसची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली | Loksatta

“तुझी पँट कुठे आहे?” कियारा आडवाणीच्या शॉर्ट ड्रेसची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

करण जोहरच्या पार्टीतील कियारा आडवाणीचा लूक चर्चेत आहे.

“तुझी पँट कुठे आहे?” कियारा आडवाणीच्या शॉर्ट ड्रेसची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
कियारा आडवाणीच्या लूकची नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत गणली जाते. अनेकदा ती तिची स्टाइल आणि फॅशनमुळेही सोशल मीडियावर चर्चेत असते. तिचे इन्स्टाग्रामवरील फोटो अनेकदा व्हायरल होतात. आपल्या ग्लॅमरस अदांनी चाहत्यांना घायाळ करणाऱ्या कियाराला सध्या मात्र सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. फॅशनसाठी अनेकदा चर्चेत असणाऱ्या कियाराचा असा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे ज्यातील तिच्या लूकची नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली आहे.

निर्माता करण जोहरनं अलिकडेच ‘जुग जुग जियो’ चित्रपटाची सक्सेस पार्टी त्याच्या घरी आयोजित केली होती. कियारा आडवाणी या चित्रपटात मुख्य भूमिकेत होती. तिने करण जोहरच्या सक्सेस पार्टीला हजेरी लावली होती. यावेळचा तिचा लूक सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे.

आणखी वाचा- धर्मिक भावना दुखावल्याचा आरोप, कार्तिक-कियाराच्या आगामी चित्रपटाचे नाव बदललं

कियारा आडवाणीनं या पार्टीसाठी व्हाइट कलरचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता आणि त्यावर पेस्टल लाइट ग्रीन कलरचं ओव्हर साइज ब्लेझर घातलं होतं. या ड्रेसमध्ये कियारा खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत होती. पण तिचा हा लुक मात्र नेटकऱ्यांच्या फारसा पसंतीस पडलेला नाही. त्यांनी यावरून तिला सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

कियारा आडवाणीचा हा व्हिडीओ प्रसिद्ध व्हिडीओ जर्नलिस्ट विरल भयानी यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओवर कमेंट करताना एका युजरनं लिहिलं, “दीदी पँट घालायला विसरली का?” दुसऱ्या एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलं, “मला समजत नाही हे लोक कोटसोबत पँट का नाही खरेदी करत नाहीत.” तर आणखी एका युजरनं लिहिलं, “तुझी पँट कुठे आहे?” याशिवाय इतरही अनेक युजर्सनी कियाराला सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे.

आणखी वाचा- “स्वयंपाक घरात जाऊ नकोस…” मासिक पाळीच्या वेळी प्रसिद्ध अभिनेत्रीला मिळाला होता सल्ला

दरम्यान कियारा आडवणीच्या कामाबद्दल बोलायचं तर ती आगामी काळात अभिनेता कार्तिक आर्यनसोबत ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा एकत्र दुसरा चित्रपट असणार आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘भूल भुलैय्या २’मध्ये दोघांची जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसली होती. ‘भूल भुलैय्या २’ हा २०२२ मधील सर्वात यशस्वी बॉलिवूड चित्रपट आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“प्रिय लक्ष्मी रोड…” ‘मिसेस मुख्यमंत्री’ फेम अभिनेत्याची गणेशोत्सवानिमित्ताने खास पोस्ट

संबंधित बातम्या

‘आरआरआर’, ‘केजीएफ’ नव्हे तर ‘या’ चित्रपटाला लोकांनी सर्वाधिक सर्च केलंय; गुगलने दिली माहिती
“दीपाली सय्यद यांनी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून बोगस लग्न लावली”, माजी स्वीय्य सहाय्यकाचे गंभीर आरोप; राज्यपालांवर
विश्लेषण : गुजरातमध्ये भाजपासाठी केलेलं ‘ते’ भाषण भोवलं! परेश रावल यांच्याविरोधात FIR दाखल; जाणून घ्या नेमकं घडलं काय
Akshay Kumar as Shivaji Maharaj:अक्षयचा महाराजांचा लुक आणि बल्बचं झुंबर यांची सोशल मिडियावर चर्चा
‘पसूरी’, ‘श्रीवल्ली’ की ‘चांद बालियां’? पाहा कोणतं आहे २०२२ मधील सर्वात लोकप्रिय गाणं

व्हिडिओ

ताज्या बातम्या
नोटाबंदीसंबंधी कागदपत्रे सादर करा!; केंद्र सरकार, रिझव्‍‌र्ह बँकेला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
रायगडमध्ये युती-आघाडी जुळवताना कसरत; ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी
तालिबानने ताबा घेतल्यापासून अफगाणिस्तानमध्ये प्रथमच जाहीर फाशी
दिल्ली पालिकेत ‘आप’ची सत्ता; भाजपची १५ वर्षांची राजवट संपुष्टात, काँग्रेस आणखी क्षीण
कर्जे महाग!; रिझव्‍‌र्ह बँकेकडून रेपो दरात ०.३५ टक्क्यांनी वाढ