आई गं किती गोड ! कियारा आडवाणीची नक्कल करणाऱ्या ‘या’ चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल

छोट्या कियाराचा ‘हा’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

kiara
(Photo-Shivani Khanna/ Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी सध्या तिचा सुपरहिट चित्रपट ‘शेरशाह’ साठी चर्चेत आहे. या चित्रपटात तिने कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या प्रेयसी डिंपल यांची भूमिका साकारली आहे.  सिद्धार्थ मल्होत्रा सोबतच प्रेक्षकांना डिंपलची भूमिका देखील प्रचंड प्रमाणात आवडली आहे. या चित्रपटातील तिचा सिंपल लूक आणि दमदार डायलॉगसवर फॅन्स फिदा झाले आहेत. तिच्या सारखा ड्रेस परिधान करुन रील्स तरुणच नव्हे तर लहान मुलं देखील तयार करुन त्यांच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करताना दिसत आहेत. असाच एक चिमुकलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या चिमुकलीचे नाव कियारा खन्ना असून तिने कियाराची हुबेहूब नक्कल केली आहे. ऐवढच नाही तर चित्रपटामध्ये कियाराने परिधान केलेला लूक सुद्धा तिने परिधान केल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. तिच्या या व्हिडीओवर नेटकरी फिदा झाले असून या छोट्या मुलीचे कौतुक होतं आहे. तिच्या व्हिडीओवर हजारो पेक्षा जास्त लाइक्स मिळत आहेत आणि नेटकरी कमेंट करुन त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. या छोट्या कियाराचा हा व्हिडीओ सिद्धार्थ शुक्ला आणि कियाराने देखील त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत तिचे कौतुक केले आहे.

कियारा आडवाणीने ‘फगली’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. नंतर ‘कबीर सिंह’ आणि ‘धोनी’ या चित्रपटातून तिला प्रसिद्धी मिळाली. तिच्या ‘शेरशाह’ हा चित्रपट अॅमेझोन प्राइमवर सर्वाधिक पहिला जाणारा चित्रपट ठरला आहे. तिने ‘इंदु की जवानी’, ‘लक्ष्मी बॉम्ब’, ‘गुड न्यूज’ सारख्या अनेक चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. तसंच ‘भूल भूलैया 2’, ‘जुग जुग जियो’ आणि ‘मिस्टर लेले’ सारख्या चित्रपटात झळकणार आहे. कियाराने नुकताच आगामी चित्रपटाचा पोस्टर लूक तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या चित्रपटाता तिच्यासोबत साऊथचा सुपरस्टार राम चरणसोबत काम करताना दिसणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kiara advani s little fan imitates her shershah role video went viral aad