scorecardresearch

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाबाबत अभिनेत्रीच्या वडिलांनी दिल्या खास शुभेच्छा; म्हणाले….

नुकतंच अडवाणी आणि मल्होत्रा कुटुंबीय या शाही विवाह सोहळ्यासाठी जैसलमेरला रवाना झाले आहेत

sid kiara final
फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक टीम

बॉलिवूडमधील सध्याची चर्चेतील जोडी म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाच्या चर्चा काही दिवसांपासून सुरु होत्या. अखेर ६ फेब्रुवारी रोजी विवाह सोहळा पार पडणार आहे. सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाची तयारी सध्या जोरदार सुरू आहे. सिद्धार्थ-कियाराचा शाही विवाहसोहळा जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसवर पार पडणार आहे. या लग्न सोहळ्यासाठी अडवाणी आणि मल्होत्रा कुटुंबीय नुकतेच जैसलमेरला रवाना झाले त्यावेळी कियाराच्या वडिलांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

कियारा अडवाणी आणि तिची टीमदेखील जैसलमेरला पोहचले आहेत. कियाराचे वडील जैसलमेरला पोहचल्यावर पापाराझींनी त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच लाडक्या लेकीच्या लग्नाबद्दल त्यांची प्रतिक्रिया विचारली असती ते म्हणाले तिला ऑल द बेस्ट आणि गाडीत बसून ते हॉटेलकडे रवाना झाले. सिद्धार्थ मल्होत्राच्या कुटुंबियांनीही पापाराझींच्या या शुभेच्छा मोठ्या आनंदाने स्वीकारल्या. त्याबरोबर त्यांचे आभारही मानले.

Kiara Siddharth Wedding Update: सिद्धार्थ कियाराच्या शाही लग्नसोहळ्यात दिसणार हे सेलिब्रिटीज; करण जोहरसह राम चरणही लावणार हजेरी

या लग्नासाठी १०० ते १२५ लोकांना निमंत्रण दिलं गेलं आहे. या विवाह सोहळ्याला त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रपरिवाराबरोबरच बॉलिवूडमधील दिग्गज स्टार्स नाही आमंत्रित केलं गेलं आहे. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, वरुण धवन यांबरोबरच अनेक आघाडीचे कलाकार यांच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावतील.

दरम्यान सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नाच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने येत आहे. मात्र याबद्दल कुटुंबियांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सूर्यगढ पॅलेसवरील लक्झरी व्हिला कियारा-सिद्धार्थने बुक केला आहे. या व्हिलामध्ये तब्बल ८४ खोल्यांचं बुकिंग करण्यात आलं आहे. तर पाहुण्यांसाठी ७० गाड्याही बुक करण्यात आल्या आहेत. सूर्यगढ पॅलेसवरील एका दिवसाचं भाडं एक ते दोन कोटींच्या घरात आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 14:11 IST