scorecardresearch

“जेव्हा मी लग्न करेन तेव्हा आलिया…” सिद्धार्थच्या एक्स गर्लफ्रेंडबद्दल कियारा आडवाणीचं मोठं वक्तव्य

मागच्या बऱ्याच काळापासून सिद्धार्थ- कियाराच्या लग्नाच्या चर्चा आहेत.

Shahid Kapoor, Siddharth Malhotra, Kofee With Karan 7, koffee with karan 7, karan johar, sidharth malhotra, kiara advani, kiara advani love story, sidharth malhotra girlfriend, कियारा आडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, करण जोहर, कियारा सिद्धार्थ लव्हस्टोरी, कॉफी विथ करण ७, करण जोहर चॅट शो
कियाराने कथित बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्राची एक्स गर्लफ्रेंड आलिया भट्टबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. एवढी सोशल मीडियावरील व्हिडीओ आणि फोटोंमुळे चर्चेत असणाऱ्या कियाराच्या नावाची चर्चा आता करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमुळे होताना दिसत आहे. कियारा आडवाणीने नुकतीच अभिनेता शाहिद कपूरसह करणच्या शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये तिने तिच्या खासगी आयुष्याबाबत बरेच खुलासे केले आहे. याशिवाय कियाराने कथित बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्राची एक्स गर्लफ्रेंड आलिया भट्टबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण ७’मध्ये शाहिद कपूरने कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची जोडी हटके असल्याचं म्हणत तिची खिल्ली उडवली. तो म्हणाला, “मी हाच विचार करत आहे की, यांची मुलं किती सुंदर असतील.” या शोमध्ये करण आणि शाहिद कियाराची खिल्ली उडवताना दिसले. त्यानंतर कियारानं सिद्धार्थ आणि तिच्या लव्ह स्टोरीबद्दल कबुली दिली.
आणखी वाचा-‘राम तेरी गंगा मैली’मधील ‘त्या’ वादग्रस्त सीनवर ३७ वर्षांनंतर मंदाकिनी यांनी सोडलं मौन, म्हणाल्या…

‘कॉफी विथ करण’च्या या भागात करण जोहरला सिद्धार्थ-कियारा यांच्या लग्नाबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर खुलासा करताना ती म्हणाली, “सिद्धार्थ हा माझा सर्वात जवळचा मित्र आहे.” यानंतर तिला लग्नाबद्दलचा प्रश्न विचारताच ती म्हणाली, “माझा लग्नावर पूर्ण विश्वास आहे. मी माझ्या आजूबाजूला अनेक छान छान विवाहसोहळे पाहिले आहेत. त्यामुळे मलाही माझ्या आयुष्यात ते घडताना पाहायचे आहे. पण हे कधी होईल हे मला सांगता येणार नाही. पण जेव्हा लग्न होईल तेव्हा मी सर्वांना बोलवणार आहे.”

आणखी वाचा- ‘अशी’ झाली होती कियारा- सिद्धार्थची पहिली भेट, करण जोहरने केला मोठा खुलासा

करण जोहरच्या चॅटशोमध्ये रॅपिड फायर राउंडमध्ये करण जोहरने कियारा आडवाणीला ‘तुझ्या लग्नाच्या वेळी ब्राइड स्क्वॉडमध्ये कोणती अभिनेत्री असायला हवी असं वाटतं?’ यावर उत्तर देताना कियाराने आलिया भट्टचं नाव घेतलं. ती म्हणाली, “मला आलिया खूप आवडते आणि मला वाटतं की ती माझ्या ब्राइड क्वॉडमध्ये असायला हवं. ती खूप क्यूट आहे आणि मला ती खूप आवडते.” आलिया भट्ट ही सिद्धार्थ मल्होत्राची एक्स गर्लफ्रेंड आहे. रणबीर कपूरच्या अगोदर ती काही वर्ष सिद्धार्थला डेट करत होती.

दरम्यान करण जोहरच्या या शोमध्ये आतापर्यंत आलिया भट्ट- रणवीर सिंह, जान्हवी कपूर- सारा अली खान, अक्षय कुमार- सामंथा रुथ प्रभु, विजय देवरकोंडा- अनन्या पांडे, आमिर खान- करीना कपूर यांच्यासह सोनम कपूर आणि अर्जुन कपूर यांनीही हजेरी लावली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-08-2022 at 17:09 IST
ताज्या बातम्या