scorecardresearch

हॉलिवूडमधील महागडा घटस्फोट! अभिनेत्री किम कार्दशियनला कान्ये वेस्ट महिन्याला देणार तब्बल ‘इतके’ कोटी रुपये

९ वर्षांनी अभिनेत्री किम कार्दशियन आणि तिचा पती कान्ये वेस्ट यांचा घटस्फोट

हॉलिवूडमधील महागडा घटस्फोट! अभिनेत्री किम कार्दशियनला कान्ये वेस्ट महिन्याला देणार तब्बल ‘इतके’ कोटी रुपये
(Photo – AP)

अभिनेत्री किम कार्दशियन आणि तिचा पती कान्ये वेस्ट यांचा अखेर घटस्फोट झाला आहे. किमने २०२१ मध्ये कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. आता यावर कोर्टाने निकाल दिला असून दोघेही कायदेशीररित्या विभक्त झाले आहेत. दोघांनाही त्यांच्या मुलांची जॉइंट कस्टडी मिळाली आहे. याबरोबरच कोर्टाने घटस्फोटात किमला कान्ये वेस्ट किती रक्कम देईल, याबद्दल आदेशही दिले आहेत.

“मला घटस्फोट हवाय”; सुश्मिता सेनचा भाऊ पत्नी चारूवर गंभीर आरोप करत म्हणाला, “तिने माझ्या मुलीचा…”

‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, किमने मार्च २०२२ मध्ये आपण सिंगल असल्याचं जाहीर केलं होतं. तसेच तिने तिच्या नावातून ‘वेस्ट’ काढून टाकलं होतं. दोघांमध्ये संपत्तीचे विभाजन आणि मुलांचा ताबा यावरून वाद निर्माण झाला होता. मंगळवारी हा वाद न्यायालयाने निकाली काढला. न्यायालयाच्या आदेशानुसार, मुलांच्या हिताचे मोठे निर्णय घेताना दोघांनाही एकमेकांशी बोलावे लागेल. तसेच मुलांची सुरक्षा, शाळा आणि कॉलेजचा खर्च किम आणि कान्ये या दोघांनाही करावा लागेल.

आता मी येतच नाय! लेक तैमूरच्या पाठीमागे धावणाऱ्या करीना कपूरचा व्हिडीओ व्हायरल

न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, मुलं जास्त वेळ किमबरोबर राहणार आहेत. तसेच कान्ये वेस्टला मुलांच्या खर्चासाठी महिन्याला २ लाख डॉलर्स म्हणजेच अंदाजे १.६५ कोटी रुपये द्यावे लागतील. किम कार्दशियन आणि कान्ये वेस्ट यांना चार मुलं आहेत. त्यांची मोठी मुलगी नॉर्थ ही ९ वर्षांची आहे. ६ वर्षांचा मुलगा सेंट, ४ वर्षांचा शिकागो आणि ३ वर्षांचा मुलगा सालम आहेत. दोघांचंही लग्न ९ वर्षे टिकलं.

“माझ्या किसिंग सीनचा व्हिडीओ मुलाने पाहिला अन्…” लेकालाच मुर्ख म्हणत ट्विंकल खन्नाचा खुलासा

दरम्यान, सध्या कान्ये वेस्ट नवीन अडचणीत सापडला आहे. स्पोर्ट्सवेअर कंपनी आदिदासने रॅपरविरोधात चौकशी सुरू केली आहे. कंपनीच्या एका सदस्याने वेस्टला एक निनावी पत्र लिहून आरोप केला आहे की तो मीटिंग दरम्यान लोकांना अडल्ट कंटेंट दाखवायचा. तसेच त्याने नोकरीच्या मुलाखतीदरम्यान किम कार्दशियनचा एक इंटिमेट फोटोही लोकांना दाखवला होता, असा आरोपही त्याच्यावर करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 19:51 IST

संबंधित बातम्या