scorecardresearch

“…म्हणून मला माझे दागिने विकावे लागणार”, किरण खेर यांनी केले वक्तव्य

किरण खेर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

kirron kher, sikandar kher,
किरण खेर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री आणि भाजपा खासदार किरण खेर यांना कॅन्सर झाल्याचे समोर आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्या कॅन्सरवर उपचार घेत होत्या. पण आता किरण यांनी कॅन्सरवर मात केली असून त्या पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तेव्हा पासून किरण या सोशल मीडियावर फार काही सक्रिय नाहीत आणि त्या सध्या स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देत आहेत. दरम्यान, त्या आता इंडियाज गॉट टॅलेंटच्या ९व्या सीजनच्या परिक्षक म्हणून दिसणार आहेत.

या शोचे परिक्षक आधी किरण खेर, मलायका अरोरा आणि करण जोहर करत होते. मात्र, काही कारणांमुळे मलायका आणि करणच्या जागी आता शिल्पा शेट्टी आणि बादशाहला घेण्यात आले आहे. मात्र, कोणताही सीजन असो सगळ्यांचे लक्ष हे किरण राव यांच्या दागिन्यांनी वेधले आहे. त्या नेहमीच सिल्क साडी आणि अप्रतिम अशा दागिन्यांमध्ये दिसल्या आहेत. त्यात नुकताच शिल्पाने सोशल मीडिया एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत शिल्पा किरण राव यांच्याशी बोलत असून त्यांच्या दागिन्यांविषयी बोलताना दिसते.

आणखी वाचा : शत्रुघ्न सिन्हांची मुलगी होणार सलीम खान यांची सून? सोनाक्षीने केला तिच्या पहिल्या प्रेमाचा खुलासा

आणखी वाचा : निलेश साबळेने पाया पडून मागितली नारायण राणेंची माफी; जाणून घ्या कारण

या व्हिडीओत शिल्पा बोलते की ‘मी शूटिंगवर फक्त तुमचे दागिने बघण्यासाठी आली आहे.’ यावर किरण हसत बोलतात की ‘वेडेपणा करू नकोस.’ तर शिल्पा बोलते ‘तुम्ही मला दत्तक घ्या म्हणजे मला तुमचे दागिने मिळतील. सिकंदर थोडी घालणार आहे.’ किरण म्हणाल्या, ‘त्याल्या घालावे लागले तर तो घालेल, एक दिवस तर मी त्याला म्हणाले मी माझे काही दागिने विकले पाहिजे कारण तू तर लग्न कर करत नाही.’ तर तो म्हणाला, ‘असं करू नकोस, माझी पत्नी घालेल ते दागिने.’

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2021 at 12:41 IST

संबंधित बातम्या