आजकाल चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये किंसिग सीन्स, इंटिमेट सीन्स हे बऱ्याचदा पाहायला मिळतात. पण एका अभिनेत्रीला अभिनेत्यासोबत असे सीन देणे फार कठीण नसते. पण जेव्हा एखाद्या अभिनेत्रीला दुसऱ्या अभिनेत्रीसोबत असे सीन द्यावे लागतात तेव्हा ते फार कठीण होऊन जाते. अशाच एका सीन विषयी अभिनेत्रीने किर्ती कुल्हारीने खुलासा केला आहे.

काही दिवसांपूर्वीच ‘ह्युमन’ ही वेब सीरिज डिस्नेप्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाली आहे. या सीरिजमध्ये किर्ती कुल्हारी आणि शेफाली शाह या मुख्य भूमिकेत आहेत. तसेच त्यांनी सीरिजमध्ये एक किसिंग सीन दिला आहे. याविषयी ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी वक्तव्य केले. एका अभिनेत्रीसोबत किसिंग सीन देणे किती कठीण असते हे त्यांनी सांगितले आहे.
आणखी वाचा : ‘इंटिमेट सीन शूट करत असताना…’, वाणी कपूरचा धक्कादायक खुलासा

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
in Pune Unborn Child Dies as Pregnant Woman Beaten by a neighbor One Arrested
पुणे : शेजाऱ्याने केलेल्या मारहाणीत गर्भवती महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू
delivery boy slept on his bike,
“थकलेल्या जीवाला सावलीचा विसावा”, कडक उन्हात रस्त्याच्या कडेला दुचाकीवरच झोपला डिलिव्हरी बॉय! Video Viral

‘काही सीनमध्ये आम्हाला एकमेकींच्या हाताला स्पर्श करायचा होता आणि किसिंग सीन द्यायचा होता. मी एक अभिनेत्री असल्यामुळे मला हे करावे लागणार होते आणि त्यासाठी मी तयार देखील होते. मी यापूर्वी असे सीन शूट केले नव्हते. एखाद्या महिलेसोबत असा सीन शूट करणं माझ्यासाठी आव्हानात्मक होते’ असे किर्ती म्हणाली.

पुढे ती म्हणाली, ‘या सीनसाठी कोणताही तयारी करुन फायदा नव्हता असे मला सतत वाटत होते. माझ्यासमोर महिला आहे की पुरुष हा प्रश्न नव्हता, तर त्या व्यक्तीसाठी माझ्या काय भावना असतील, त्या भावना पडद्यावर उतरवणे हे मोठे आव्हान होते.’

ह्युमनमधील किसिंग सीन शूट करण्यासाठी किर्ती आणि शेफालीला जवळपास आठ ते दहा रिटेक द्यावे लागले होते. ‘या दृश्यासाठी आम्ही कोणतीही पूर्व तयारी केली नव्हती. त्यामुळे शूटिंगसाठी आम्हाला आठ ते दहा रिटेक द्यावे लागले होते. सीन शूट झाल्यानंतर मी सुटकेचा नि:श्वास सोडला. पण त्यावेळी दिग्दर्शक पुन्हा आले आणि त्यांनी रिटेक द्यायला सांगितला’ असे किर्ती म्हणाली.