scorecardresearch

“अमिताभ समोरच्याला घाबरवतो का?”; किशोर कदम यांनी सांगितला बिग बींसोबत काम करण्याचा अनुभव

किशोर कदमने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

kishore kadam, amitabh bachchan, nagraj manjule, jhund,
किशोर कदमने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांचे लक्ष या चित्रपटावरून लागून होतं. अमिताभ यांनी पंत्याहत्तरी ओलांडली असली तरी देखील ते एका तरुण कलाकारासारखे काम करताना दिसतात. अमिताभ यांच्या ‘झुंड’ या चित्रपटात त्यांनी अनेक मराठी कलाकारांसोबत काम केलं. त्यापैकी एक म्हणजे किशोर कदम. हा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या निमित्ताने किशोर कदम यांनी फेसबूकवर एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या त्यांनी केलेली पोस्ट चर्चेत आहे.

किशोर कदम यांनी त्याच्या फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. यात किशोर कदम यांनी ३ फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत “यातल्या तिसऱ्या फोटो फ्रेममध्ये अमिताभ बच्चन ही एकच व्यक्ती तुम्हाला दिसत आहे. मला ही तिच व्यक्ती दिसत आहे. ही व्यक्ती माझ्या मनाच्या पडद्यावर कोरला गेलाय. आजवर मी त्याला दोनदा भेटलो आहे. पहिल्यांदा मी एका पुरस्कारात भेटलो होतो तेव्हा आणि आता नागराजच्या झुंडच्या सेटवर सतत दहा दिवस. तेव्हा ही मी एक फोटो काढला होता. त्यांच्यासोबत काम केल्यानंतर अमिताभ बोलतो का सेटवर? कॉम्पलेक्स येतो का रे त्याचा? समोरच्याला घाबरवत असेल ना तो? काय बोललास त्याच्या बरोबर? असे अनेक प्रश्न कुणी कुणी मला विचारत होत, त्यावेळी त्यांना काय उत्तर द्याव हे मला कळतं नाही”, असे किशोर कदम म्हणाले.

आणखी वाचा : पुष्पाची एण्ट्री होताच श्रेयस तळपदेला आली चक्कर, पाहा Video

पुढे किशोद कदम म्हणाले, “जिथे त्या माणसासोबत एकाच फ्रेममध्ये असून मीच माझ्यासाठी इनव्हीजिबल होतो त्या माणसाबद्दल असल्या प्रश्नांना उत्तरं देत बसण्यात अर्थ नाही असं मला वाटतयं. नागराजमुळे मला या महान व्यक्तीसोबत काम करता आलं हे नागराजचे माझ्यावर असलेले उपकार आहेत. काल झुंड पाहिला आणि ही व्यक्ती किती ग्रेट अभिनेता आहे हे मला पुन्हा एकदा कळलं. आपलं सगळं स्टारडम, अँग्री मॅनची प्रतिमा आणि लोकांनी दिलेलं देवत्व विसरून एका साध्या फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका ज्या ग्रेसफुली या माणसाने साकारली त्याला शब्द नाहीत. नागराजसारख्या तीनेक चित्रपटांचा अनुभव असलेल्या दिग्दर्शकासोबत काम करण्याचा निर्णय या माणसाने घेतला.” याचाच अर्थ नागराजमधलेलं असलेलं टॅलेन्टं अशा व्यक्तीला कळत ज्याला वर्षानुवर्षाचा अनुभव आहे.

आणखी वाचा : रितेशचा ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स पाहताच जिनिलियाने दिला धक्का अन्…

पुढे किशोर म्हणाला, “नागराजचा ‘झुंड’ प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव देऊ शकतो. एकीकडे अमिताभ सारखा अनुभवी नट तर दुसरीकडे नागपूर परिसरातल्या झोपडपट्टी आणि फुटपाथवरली दहाबारा पोरं हे कॅाम्बिनेशन नागराजने ‘फॅंन्ड्री’ , ‘सैराट’, ‘नाळ’ नंतर पुन्हा एकदा यशस्वी करून दाखवलं आहे. अगदी नव्या कोऱ्या आणि सामान्य लोकांना घेऊन त्यांच्या कडुन अगदी नैसर्गिक वाटेल असं कामं करून घेण्याची कळ नागराजला सापडलीये… त्या सात आठ पोरांचं काम बघून नट म्हणून हताश झाल्यासारखं वाटतं.. इतक्या नैसर्गिकरित्या त्यांनी काम केलयं की दर वेळी आपल्यालाही असं काम करता आलं पाहिजे असं वाटत राहतं.” यानंतर किशोरने चित्रपटाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

आणखी वाचा : “मला सुद्धा मराठी चित्रपट करायचाय, जर नागराज…”; झुंड पाहिल्यानंतर आमिरने केले वक्तव्य

दरम्यान, ‘झुंड’ हा चित्रपट स्लमसॉकरचे संस्थापक विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ हा चित्रपट ४ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु यांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kishore kadams post his experiance working with amitabh bachchan in nagraj manjules jhund movie dcp

ताज्या बातम्या