scorecardresearch

“सुरी पाहिल्यावर मला संजय राऊत आठवतात” किशोरी पेडणेकर यांचा Video चर्चेत

किशोरी पेडणेकर यांचा ‘किचन कल्लाकार’च्या मंचावरील हा व्हिडीओ बराच चर्चेत आहे.

किशोरी पेडणेकर यांनी संजय राऊत यांच्याबाबत केलेलं वक्तव्य सर्वाधिक चर्चेत आहे.

झी टीव्हीवरील ‘किचन कल्लाकार’ हा कार्यक्रम सध्या बराच चर्चेत आहे. दिग्गज कलाकारांपासून ते राजकारण्यांपर्यंत अनेकांनी आतापर्यंत या शोच्या मंचावर हजेरी लावली आहे. सुरुवातीपासूनच या कार्यक्रमानं प्रेक्षकांच्या मनात आपली जागा कायम केली आहे. नुकतीच या कार्यक्रमात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे आणि भाजपच्या चित्रा वाघ यांनी हजेरी लावली होती होती.

झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात किशोरी पेडणेकर यांनी संजय राऊत यांच्याबाबत केलेलं वक्तव्य सर्वाधिक चर्चेत आहे. या शोमध्ये किशोरी पेडणेकर यांना एक टास्क देण्यात आला होता. या टास्कमध्ये त्यांना दिल्या गेलेल्या बॉक्समधून ज्या वस्तू निघतील त्या पाहून कोणचा चेहरा आठवतो हे त्यांना सांगायचं होतं. या धम्माल टास्कमध्ये किशोरी पेडणेकर यांनी संजय राऊत यांचं नाव घेतलं.

या टास्कमध्ये किशोरी पेडणेकर यांनी फारच मजेदार उत्तरं दिली. त्यांनी जिलबी पाहिल्यानंतर आमदार गिरीश महाजन आठवतात असं म्हटलं. तर सुरी पाहिल्यावर मला शिवसेना नेते संजय राऊत यांचा चेहरा आठवतो असं सांगितलं. किशोरी पेडणेकर यांना देण्यात आलेल्या बॉक्समध्ये भोंगा देखील होता. यावर भोंगा पाहिल्यावर किरीट सोमय्या यांची आठवण येते असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आणि यावर चित्रा वाघ यांनीही ‘भोंग्याने जाग येते सर्वांना झोपू शकत नाही कोणी’ असा विनोदी टोला लगावला.

किशोरी पेडणेकर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. राजकारणातील गंभीर विषयांवर बोलणाऱ्या या दिग्गजांचं विनोद कौशल्य या कार्यक्रमातून प्रेक्षकांसमोर आलं. सर्वांचा नेहमीपेक्षा एक वेगळा पैलू प्रेक्षकांना या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kishori pednekar say after seen knifes i remember sanjay raut face video goes viral mrj

ताज्या बातम्या