scorecardresearch

“सध्या राहुल…” अथिया शेट्टीच्या लग्नाबद्दल वडील सुनिल शेट्टींनी दिले स्पष्टीकरण

नुकतंच अथिया शेट्टीचे वडील सुनिल शेट्टी यांनी यावर चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

“सध्या राहुल…” अथिया शेट्टीच्या लग्नाबद्दल वडील सुनिल शेट्टींनी दिले स्पष्टीकरण

अभिनेता सुनिल शेट्टीची लेक अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल एकमेकांना डेट करत आहे. ते अनेकदा बाहेर एकत्र फिरताना, डिनरला जाताना दिसतात. तसेच ते दोघेही त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. आता लवकरच अथिया-केएल राहुल लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्याही सध्या चर्चा रंगत आहेत. नुकतंच अथिया शेट्टीचे वडील सुनिल शेट्टी यांनी यावर चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अनेक बॉलिवूड कलाकार विवाहबंधनात अडकत असल्याचे दिसत आहे. अभिनेत्री कतरिना कैफ-विकी कौशल, अभिनेता रणबीर कपूर आलिया भट्ट यांच्यापाठोपाठ आता अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया व मुलगा अहान शेट्टी लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. या चर्चांवर आता स्वत: सुनील शेट्टीने वक्तव्य करत पूर्णविराम दिला आहे. याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे.
आणखी वाचा : ‘खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो’ मूडमध्ये दिसले आथिया आणि के. एल. राहुल; ‘तडप’च्या स्क्रीनिंगला लव्हबर्ड्सची उपस्थिती

या व्हिडीओत सुनील शेट्टीला अथिया आणि राहुल यांना लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. अथिया आणि राहुल यांच्या लग्नाची तयारी सुरु आहे, असे आम्ही ऐकलं आहे. त्यांचं लग्न कधी होणार आम्हाला त्याबद्दल जाणून घ्यायचे आहे. त्यावर उत्तर देताना सुनील शेट्टी म्हणाला, “याबद्दल आता मुलंच ठरवतील.”

“सध्या राहुलचे शेड्युल फार व्यस्त आहे. आता आशिया कप आहे. विश्वचषक आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया मालिका सुरु होणार आहे. त्यामुळे जेव्हा मुलांना वेळ मिळेल तेव्हा ते याबद्दल ठरवतील. एका दिवसात लग्न थोडी होऊ शकतं, असेही सुनील शेट्टीने म्हटले.

आणखी वाचा : हिंदी चित्रपट सातत्याने फ्लॉप होण्यावर मनोज बाजपेयीचे वक्तव्य, म्हणाला “वाईट घटनांचा…”

दरम्यान अथिया आणि केएल राहुल पुढील तीन महिन्यांमध्ये लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे. “३ वर्षांपासून अधिक काळ अथिया-के एल राहुल एकमेकांना डेट करत आहेत. पुढील ३ महिन्यांमध्ये हे दोघं लग्न करतील. सध्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे.” असे अथियाच्या जवळच्या व्यक्तीने म्हटले होते. त्याशिवाय राहुलच्या कुटुंबियांनी काही दिवसांपूर्वीच अथियाच्या आई-वडिलांची भेट घेतली असल्याचीही चर्चा आहे. तसेच मध्यंतरी अथिया-राहुलने वांद्रे येथे नवं घर खरेदी केलं. ते घर पाहण्यासाठी देखील राहुलचे कुटुंबिय गेले होते. लग्नानंतर अथिया-राहुल याच घरात राहणार आहेत. मुंबईमध्येच अभिनेता सुनिल शेट्टीच्या लेकीचा विवाहसोहळा संपन्न होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या