भारतीय चित्रपटसृष्टीमधील मानाचा मानला जाणारा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना जाहीर करण्यात आला आहे. चित्रपट क्षेत्रात आणि अभिनयातील योगदानासाठी आशा पारेख यांना हा पुरस्कार देण्यात आला. ६० ते ७०च्या दशकामध्ये बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रींपैकी आशा पारेख एक होत्या. त्यांनी चित्रपटसृष्टीला दिलेलं योगदान फार मोठ आहे. आपल्या कामामुळे कलाविश्वामध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या आशा पारेख त्यांच्या खासगी आयुष्यामुळे त्यावेळी चर्चेत होत्या.

आणखी वाचा – बँक बॅलन्स संपला, घर चालवण्यासाठी पैसे हवे म्हणून शरद पोंक्षेंनी सुरु केला नवा व्यवसाय, म्हणाले, “मिठाई विकतो अन्…”

personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
devendra fadanvis
उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी; चित्रफीत शेअर करणाऱ्याला अटक
Yash Mittal Murder Noida
व्यावसायिकाच्या मुलाची चार मित्रांकडून हत्या; वडिलांकडून मागितली सहा कोटींची खंडणी
ravichandran ashwin profile
व्यक्तिवेध : रविचंद्रन अश्विन

आपल्या उत्तम अभिनयाने तसेच मोहक सौंदर्याने आशा पारेख यांनी त्यावेळी अनेक तरुणांना वेड लावलं. पण खऱ्या आयुष्यात मात्र त्यांना वैवाहिक सुख कधी मिळालंच नाही. एकतर्फी प्रेम काय असतं? हे त्यांनी चांगलंच अनुभवलं. दिग्दर्शक नासिर हुसैन यांच्याबरोबर आशा पारेख रिलेशनशिपमध्ये होत्या. पण नासिर यांचं आधीच लग्न झालं होतं. त्यामुळे या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही.

‘द हिट गर्ल’ या आपल्या पुस्तकामध्ये आशा यांनी या नात्याचा उल्लेख केला आहे. नासिर हुसैन ही एकमेव व्यक्ती अशी आहे की ज्यांच्यावर मी प्रेम केलं. म्हणूनच माझ्या पुस्तकामध्येही त्यांना जागा आहे असं आशा यांनी म्हटलं होतं. आशा यांनी त्यांच्या पुस्तक प्रदर्शनाच्या कार्यक्रमादरम्यान म्हटलं होतं की, “प्रत्येक जोडी ही देवच बनवतो. पण लग्नासाठी देवाने माझी जोडीच बनवली नाही. लग्न करण्याचा योगायोग माझ्या आयुष्यामध्ये नव्हता. म्हणून मी लग्नच केलं नाही.”

आणखी वाचा – लालबाग-काळाचौकी अन् चाळीतलं घर; कॉमेडी क्वीन नम्रता संभेरावचा खऱ्या आयुष्याबाबत खुलासा

लग्नासाठी आशा पारेख यांना मुलं येत नव्हती असं काहीच नव्हतं. पण त्यांनी लग्न करण्याचं टाळलं. आशा यांना वयाच्या ३५व्या वर्षी मुल दत्तक घ्यायचं होतं. याबाबत त्या मुलाच्या आई-वडिलांशीदेखील बोलणं झालं होतं. पण काही काळानंतर आपण दत्तक घेत असलेला मुलगा फार काळ आयुष्य जगू शकत नाही हे त्यांना कळलं. त्यानंतर आशा पारेख या डिप्रेशनमध्ये गेल्या. या घटनेचा उल्लेख त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये केला आहे. पण शेवटपर्यंत या सुप्रसिद्ध अभिनेत्रीने लग्न केलं नाही.