विवाहित दिग्दर्शकाशी अफेअर, लग्न न करण्याचा निर्णय अन्...; आयुष्यभर एकट्याच राहिल्या आशा पारेख | know about asha parekh love story and relationship with famous director nasir hussain see details | Loksatta

विवाहित दिग्दर्शकाशी अफेअर, लग्न न करण्याचा निर्णय अन्…; आयुष्यभर एकट्याच राहिल्या आशा पारेख

ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांचं खासगी आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं आहे. त्या एका विवाहित दिग्दर्शकाच्या प्रेमात पडल्या होत्या.

विवाहित दिग्दर्शकाशी अफेअर, लग्न न करण्याचा निर्णय अन्…; आयुष्यभर एकट्याच राहिल्या आशा पारेख
ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांचं खासगी आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं आहे. त्या एका विवाहित दिग्दर्शकाच्या प्रेमात पडल्या होत्या.

भारतीय चित्रपटसृष्टीमधील मानाचा मानला जाणारा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना जाहीर करण्यात आला आहे. चित्रपट क्षेत्रात आणि अभिनयातील योगदानासाठी आशा पारेख यांना हा पुरस्कार देण्यात आला. ६० ते ७०च्या दशकामध्ये बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रींपैकी आशा पारेख एक होत्या. त्यांनी चित्रपटसृष्टीला दिलेलं योगदान फार मोठ आहे. आपल्या कामामुळे कलाविश्वामध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या आशा पारेख त्यांच्या खासगी आयुष्यामुळे त्यावेळी चर्चेत होत्या.

आणखी वाचा – बँक बॅलन्स संपला, घर चालवण्यासाठी पैसे हवे म्हणून शरद पोंक्षेंनी सुरु केला नवा व्यवसाय, म्हणाले, “मिठाई विकतो अन्…”

आपल्या उत्तम अभिनयाने तसेच मोहक सौंदर्याने आशा पारेख यांनी त्यावेळी अनेक तरुणांना वेड लावलं. पण खऱ्या आयुष्यात मात्र त्यांना वैवाहिक सुख कधी मिळालंच नाही. एकतर्फी प्रेम काय असतं? हे त्यांनी चांगलंच अनुभवलं. दिग्दर्शक नासिर हुसैन यांच्याबरोबर आशा पारेख रिलेशनशिपमध्ये होत्या. पण नासिर यांचं आधीच लग्न झालं होतं. त्यामुळे या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही.

‘द हिट गर्ल’ या आपल्या पुस्तकामध्ये आशा यांनी या नात्याचा उल्लेख केला आहे. नासिर हुसैन ही एकमेव व्यक्ती अशी आहे की ज्यांच्यावर मी प्रेम केलं. म्हणूनच माझ्या पुस्तकामध्येही त्यांना जागा आहे असं आशा यांनी म्हटलं होतं. आशा यांनी त्यांच्या पुस्तक प्रदर्शनाच्या कार्यक्रमादरम्यान म्हटलं होतं की, “प्रत्येक जोडी ही देवच बनवतो. पण लग्नासाठी देवाने माझी जोडीच बनवली नाही. लग्न करण्याचा योगायोग माझ्या आयुष्यामध्ये नव्हता. म्हणून मी लग्नच केलं नाही.”

आणखी वाचा – लालबाग-काळाचौकी अन् चाळीतलं घर; कॉमेडी क्वीन नम्रता संभेरावचा खऱ्या आयुष्याबाबत खुलासा

लग्नासाठी आशा पारेख यांना मुलं येत नव्हती असं काहीच नव्हतं. पण त्यांनी लग्न करण्याचं टाळलं. आशा यांना वयाच्या ३५व्या वर्षी मुल दत्तक घ्यायचं होतं. याबाबत त्या मुलाच्या आई-वडिलांशीदेखील बोलणं झालं होतं. पण काही काळानंतर आपण दत्तक घेत असलेला मुलगा फार काळ आयुष्य जगू शकत नाही हे त्यांना कळलं. त्यानंतर आशा पारेख या डिप्रेशनमध्ये गेल्या. या घटनेचा उल्लेख त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये केला आहे. पण शेवटपर्यंत या सुप्रसिद्ध अभिनेत्रीने लग्न केलं नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“फाल्गुनी पाठक यांच्या ‘मैने पायल है छनकाई’पेक्षा नेहाने…” धनश्री वर्माने केलं ‘ओ सजना’चं कौतुक

संबंधित बातम्या

“सतत एकेरी उल्लेख करतोय कारण…” विक्रम गोखलेंच्या निधनानंतर शरद पोंक्षे यांचं ट्वीट चर्चेत
“एवढ्या खालच्या थराला…” मानसी नाईकने सांगितले घटस्फोट घेण्यामागचे कारण
“विक्रम गोखले साहेबांनी चक्क मला…”; संकर्षण कऱ्हाडेने भावूक होत शेअर केल्या शूटिंगच्या आठवणी, पोस्ट व्हायरल
विक्रम गोखलेंच्या निधनानंतर ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची प्रतिक्रिया म्हणाले, “अभिनयाची संस्था…”
“मुलींना मेसेज करता तेव्हा त्यांचे कपडे…” चेतन भगत यांच्या वक्तव्यानंतर उर्फी जावेद संतापली

व्हिडिओ

ताज्या बातम्या
हिवाळ्यात भाज्या लगेच खराब होत आहेत का? जास्त काळ ताज्या राहाव्या यासाठी वापरा ‘या’ टिप्स
स्वयंपाक करताना अचानक गॅस संपण्याची भीती? आता व्हा टेंशन फ्री, जाणून घ्या शिल्लक गॅस ओळखण्याच्या सोप्या पद्धती
Tips To Reduce Electricity Bill: मस्तच! वीजबिल येईल कमी; ताबडतोब घरात बसवा ‘हे’ डिव्हाइस
लोणावळ्यात बंगल्यातील जलतरण तलावात बुडून बालिकेचा मृत्यू
पुणे: नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला ई-रजिस्ट्रेशन प्रणालीसाठी राष्ट्रीय पुरस्कार