राखी सावंतचा होणारा नवरा दीपक कलाल आहे तरी कोण?

राखी ३१ डिसेंबरला दीपक कलालसोबत लग्न करणार आहे.

राखी सावंत, दिपक कलाल

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी दीपिका -रणवीर ही जोडी लग्नाच्या बंधनात अडकल्यानंतर साऱ्यांच्या नजरा अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनासकडे वळल्या आहेत. त्याच बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतनेदेखील आता लग्न करणार असल्याचं जाहीर केलं. राखी दीपक कलालाशी लग्न करणार असून नक्की कोण आहे दीपक कलाला हे जाणून घेऊयात.

राखीने काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर तिच्या लग्नाची पत्रिका शेअर करुन येत्या ३१ डिसेंबरला ती दीपक कलालसोबत लग्न करणार आहे. राखीची ही पोस्ट वाचून अनेकांना धक्का बसला तर काहींना दीपक कलाल कोण आहे हा प्रश्न पडला. दीपक कलाल सध्या छोट्या पडद्यावरील ‘इंडियाज् गॉट टॅलेंट’मध्ये झळकत असून तो त्याच्या कॉमिक टायमिंगसाठी ओळखला जातो.

दीपक त्याचे फोटो आणि आगळ्यावेगळ्या व्हिडिओसाठी ओळखला जातो. त्याच्या याच चित्रविचित्र व्हिडिओजमुळे सोशल मीडियावर त्याचे असंख्य चाहते आहेत. विशेष म्हणजे इंटरनेट सेन्सेशन बनण्यापूर्वी दीपिक पुण्यातील एका हॉटेलात रिसेप्शनिस्ट होता.

लोकप्रिय ठरत असलेल्या दीपकला घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्ध्यावर सोडावं लागलं. त्याने दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असून पुढे हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला. त्यानंतर एका हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्टची नोकरी स्वीकारली.

दरम्यान, २०११ मध्ये काश्मिरातून त्याचा पहिला व्हिडिओ आला. यानंतर त्याचे अनेक अ‍ॅडल्ट व्हिडिओही आलेत. या व्हिडिओसाठी तो प्रचंड ट्रोलही झाला. दीपक एक ट्रॅव्हल ब्लॉगर आहे. गोव्यात त्याचे एक हॉटेल असल्याचं त्याच्या सोशल मीडियावरील प्रोफाईलमध्ये दिसून येत आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Know about rakhi sawants fianc deepak kalal