अभिनेत्री क्रिती सेनॉनने बॉलिवूडमध्ये तिचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. फार कमी काळात क्रितीने हटके भूमिका साकारत प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या‘मीमी’ या चित्रपटात तिने एका सरोगेट आईची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी तिचे विशेष कौतुक केले जात आहे. यासाठी तिने तब्बल १५ किलो वजन वाढवलं होतं. त्यामुळे अनेकांनी तिची तुलना अभिनेता आमिर खानशी केली होती. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान तिने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

मिमी हा चित्रपट या वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झाला. हा चित्रपट एका लोकप्रिय मराठी चित्रपटाचा रिमेक आहे. याचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. यात पंकज त्रिपाठी, मनोज पाहवा आणि सुप्रिया पाठक हे कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत. नुकतंच तिने इंडिया टुडे या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. तुला लेडी आमिर खान म्हणता येईल का? असा प्रश्न तिला विचारण्यात आला.

यावर ती म्हणाली, “नाही नाही. माझ्यावर इतका दबाव देऊ नका. आमिर खान सरांपर्यंत जाणे हे अजूनही लांब आहे. पण मी एवढं नक्कीच सांगू शकते की, जेव्हा तुम्ही मेहनत करता तेव्हा तुम्ही ते पात्र उत्कंठतेने जगता. त्याचे कौतुक केले जाते. अनेक लोक तुमचे काम पाहतात तेव्हा समाधान मिळते.”

हेही वाचा : सर्वाधिक सर्च केलेल्या सेलिब्रिटींची यादी जाहीर, सिद्धार्थ शुक्ला पहिल्या, तर आर्यन खान कितव्या क्रमांकावर?

दरम्यान काही दिवसांपूर्वी ‘मीमी’ चित्रपटातील प्रसूतीच्या सीनबद्दल सांगताना क्रिती म्हणाली, “अनेक हिंदी सिनेमांमध्ये प्रसूतीच्या दृश्यामंध्ये हलकी फुलकी कॉमेडी दाखवली जाते किंव काही वेळेला त्या सीनमध्ये प्रसूतीचे बारकावे न दाखवत साधेपणाने सीन केला जातो. मात्र आमचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना या सीनमध्ये वास्तविकता हवी होती. ते म्हणाले की तुला पाहून एखाद्या पुरुषाला त्या वेदना जाणवल्या पाहिजेत. त्या पुरुषांना हे लक्षात यायला हवं एक स्त्री प्रसूतीच्या वेळी कोणत्या वेदनांचा सामना करते आणि त्यानंतर त्यांना पत्नीचा अभिमान वाटायला हवा, असं दिग्दर्शकाने थोड्याकात समजावलं होतं.” असे तिने सांगितले होते.

‘मीमी’ हा सिनेमा समृद्धी पोरे यांच्या २०११ सालातील ‘आई व्हायचंय मला’ या राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेल्या सिनेमाचा रिमेक आहे. या सिनेमात क्रितीसोबत पंकज त्रिपाठी आणि सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत दिसत आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलंय . हा चित्रपट ३० जुलै रोजी नेटफ्लिक्स आणि जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.