नियतीने त्याला बनवलं ‘बिग बॉस मराठी’चा पहिला कॅप्टन

‘बिग बॉस’च्या नियमाप्रमाणे प्रत्येक आठवड्याला १५ स्पर्धकांपैकी एकाला कॅप्टन म्हणून निवडले जाते, जो सर्वांचं प्रतिनिधित्व करेल. महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे हक्क कॅप्टनला मिळतात.

bigg boss
'बिग बॉस मराठी'
वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय ठरलेला ‘बिग बॉस’ हा रिअॅलिटी शो मराठीतही सुरू झाला आहे. या शोमध्ये कोणकोणते स्पर्धक सहभागी होतील याची उत्सुकता अनेकांनाच होती. रविवारी प्रसारित झालेल्या ग्रँड प्रिमिअरच्या दिवशी ‘बिग बॉस मराठी’चा १०० दिवसांचा खेळ कोणामध्ये रंगणार हे स्पष्ट झालं. १५ स्पर्धकांची ओळख प्रेक्षकांना झाली आणि पहिल्याच दिवशी या शोने प्रेक्षकांची मनं जिंकली.

‘बिग बॉस’च्या नियमाप्रमाणे प्रत्येक आठवड्याला १५ स्पर्धकांपैकी एकाला कॅप्टन म्हणून निवडले जाते, जो सर्वांचं प्रतिनिधित्व करेल. घरातल्या सर्वांची मतं घेऊन ज्याला बहुमत मिळेल तो कॅप्टन ठरतो. पहिला कॅप्टन कोण ठरणार याचं कुतूहल प्रेक्षकांनाही होतं. ‘बिग बॉस मराठी’चा पहिला कॅप्टन ठरला तो म्हणजे छोटा पॅकेट बडा धमाका, अर्थात विनीत भोंडे. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या विनोदवीर विनित भोंडेने बाजी मारली. कॅप्टनसाठी चिठ्ठ्या टाकल्या गेल्या आणि त्या चिठ्ठीत विनीतचं नाव आलं. अशाप्रकारे नियतीने विनीतला पहिला कॅप्टन ठरवलं. त्यानुसार पहिल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातील महत्त्वाचे निर्णय घेण्याचा हक्क त्याला मिळाला आहे.

Bigg Boss Marathi: पंधरा कलाकार आणि शंभर दिवसांचा खेळ

थुकरटवाडीच्या मंचावरील त्याचा उत्साह पाहून सगळेच त्याला ‘छोटा पॅकेट, बडा धमाका’ असं म्हणायचे. त्याचा मोठा चाहता वर्गही तयार झाला आहे. त्यामुळं हा ‘छोटा पॅकेट’ बिग बॉसच्या घरात काय धमाका करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

मूळचा औरंगाबादचा असलेल्या विनीत भोंडे यानं निशिकांत कामत यांच्या ‘डोंबिवली फास्ट’ या चित्रपटातून अभिनयाची कारकीर्द सुरू केली होती. मात्र, त्याला खरी ओळख मिळाली ती ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळं. आता बिग बॉस मराठीत्या घरात विनीतचे प्रश्न, त्याचा हजरजवाबीपणा, त्याचा मिश्कील स्वभाव प्रेक्षकांना नक्कीच आवडेल यात शंका नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Know who became first captain of bigg boss marathi