Premium

VIDEO : ‘कॉफी विथ करण’च्या शोमध्ये लग्नाच्या पहिल्या रात्रीबाबत भलतंच बोलून गेली आलिया भट्ट, व्हिडीओ व्हायरल

‘कॉफी विथ करण’ शोच्या नव्या सीझनमध्ये आलिया भट्ट आपल्या खासगी आयुष्याबाबत बोलताना दिसणार आहे.

Koffee with karan 7 alia bhatt
'कॉफी विथ करण' शोच्या नव्या सीझनमध्ये आलिया भट्ट आपल्या खासगी आयुष्याबाबत बोलताना दिसणार आहे.

सुप्रसिद्ध दिग्दर्शक करण जौहर सध्या त्याच्या ‘कॉफी विथ करण’ शोमुळे चर्चेत आहे. या लोकप्रिय शोमध्ये अनेक दिग्गज मंडळी हजेरी लावताना दिसतात. इतकंच नव्हे तर कलाकार मंडळींना या शोमध्ये खासगी आयुष्याबाबत प्रश्न विचारले जातात. ‘कॉफी विथ करण’चा हा ७वा सीझन आहे. या नव्या सीझनमध्ये अनेक कलाकार मंडळी हजेरी लावतना दिसणार आहेत. त्यामध्ये अभिनेत्री आलिया भट्टचा देखील समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – “…आणि पावर काय आहे ते समजलं”, ‘धर्मवीर’मध्ये एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने सांगितला ‘तो’ किस्सा

‘कॉफी विथ करण’चा एक प्रोमो करणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. यामध्ये रणवीर सिंग आणि आलिया भट्ट दिसत आहे. करण त्यांना त्यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत प्रश्न विचारताना दिसतोय. पण गंमत अशी की लग्नानंतरची पहिली रात्र कशी असते? याबाबत आलिया भलतंच बोलून गेली. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे.
पाहा व्हिडीओ

काय म्हणाली आलिया भट्ट?
आलियाला करण लग्नानंतरच्या आयुष्याबाबत प्रश्न विचारतो. त्यावेळी ती बोलते, “लग्नाची पहिली रात्र वगैरे असं काही नसतं. कारण त्याक्षणी आपण खूप दमलेलो असतो.” आलियाचं हे उत्तर ऐकून रणवीर सिंग आणि करण जौहर दोघंही पोट धरुन हसू लागतात. आलिया नेमकं हे काय बोलून गेली? हे त्यांना देखील काही क्षणांसाठी कळत नाही. पण हा नवा प्रोमो पाहून रणवीर-आलियाचा एपिसोड गाजणार असंच दिसतंय.

आणखी वाचा – Photos : सुप्रसिद्ध दिग्दर्शकाच्या लेकीचे बॉयफ्रेंडसोबत रोमान्स करतानाचे ‘ते’ बोल्ड फोटो व्हायरल

७ जुलै पासून ‘कॉफ विथ करण’ डिस्नी प्सल हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. कतरिना कैफ-विक्की कौशल देखील या शोमध्ये हजेरी लावणार आहेत. त्याचबरोबरीने बॉलिवूडचे तीन खान शाहरुख, सलमान आणि आमिर या शोसाठी एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. पण अद्याप या शोची गेस्ट लिस्ट समोर आलेली नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Koffee with karan season 7 show new promo out alia bhatt talk about her first wedding night see video kmd

First published on: 05-07-2022 at 19:46 IST
Next Story
‘शक्तिमान’ आता मोठ्या पडद्यावर, सुपरहिरोच्या भूमिकेसाठी ‘या’ अभिनेत्याला ऑफर