महाराष्ट्राच्या राजकारणात अनन्यसाधारण स्थान असणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (१७ नोव्हेंबर) स्मृतिदिन. त्यानिमित्ताने बाळासाहेबांच्या आठवणी ताज्या करत राजकारण्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वांनीच सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. #BalasahebThackeray हा हॅशटॅग ट्विटवर ट्रेण्ड होत आहे. दरम्यान, अभिनेत्री क्रांती रेडकरने केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
क्रांतीने ट्विटर अकाऊंटवर बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी ट्वीट केले आहे. ‘आज हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन. विनम्र अभिवादन. जय महाराष्ट्र’ असे ट्वीट क्रांतीने केले आहे.
आणखी वाचा : ‘तारक मेहता…’मध्ये नट्टू काकांची भूमिका कोण साकारणार? असित मोदी म्हणाले…




दरम्यान, काही आठवड्यांपूर्वीच क्रांतीने समीर वानखेडे विरुद्ध नवाब मलिक वादाच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रामध्ये बाळासाहेबांचा उल्लेख केलेला. या पत्रामध्ये तिने, “आज बाळासाहेब असते तर त्यांना हे नक्कीच पटलं नसतं… एका महिलेवर आणि तिच्या परिवारावर होणारे खासगी हल्ले हे राजाकारणांच किती नीच स्वरुप आहे, हे नेहमीच त्यांच्या विचारातून आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आज ते नाही पण तुम्ही (मुख्यमंत्री उद्धव ठाकरे) आहात…” बाळासांहेबांबद्दल बोलताना म्हटले होते.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील एका मुलाखतीमध्ये बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. “बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन आहे. बाळासाहेब ठाकरे हे मराठी माणसांसाठी आणि देशातल्या हिंदूसाठी महान योद्धा होते. आजही त्यांचा आदर्श आणि प्रेरणा आमच्या मनामध्ये कायम आहे. त्यांचे स्मरण होत नाही असा एकही दिवस जात नाही. संपूर्ण देश त्यांना अभिवादन करत आहे. बाळासाहेब ठाकरे आज असते तर अनेक गोष्टींना ब्रेक लागला असता. काय ते मी आता सांगणार नाही,” असे संजय राऊत यांनी म्हटले.