टायगर श्रॉफच्या बहिणीने केले बोल्ड फोटोशूट, फोटो व्हायरल

कृष्णाचे हे फोटो तिच्या मॅग्झिन फोटोशूटमधील आहे. त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

krishna shroff
कृष्णाचे हे फोटो तिच्या मॅग्झिन फोटोशूटमधील आहे.

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफने अजून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नाही. तरी देखील कृष्णा ही नेहमीच चर्चेचा विषय ठरते. कृष्णा देखील भाऊ टायगरसारखी फिटनेस फ्रिक आहे. फिटनेससोबत कृष्णा नेहमीच तिच्या बोल्ड फोटोमुळे चर्चेत असते. नुकतेच कृष्णाने एक बोल्ड फोटोशूट केले होते. त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

कृष्णाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कृष्णाने काळ्या रंगाचे क्रॉप टॉप आणि काळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे. कृष्णा या फोटोत ग्लॅमरस दिसत आहे. कृष्णाच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांपासून सेलिब्रिटींनीपर्यंत अनेकांनी कमेंट केल्या आहेत. कोणी तिच्या फिटनेसची तर कोणी तिच्या अॅब्सची स्तुती केली आहे. मात्र, अनेकांचे लक्ष हे कृष्णाने तिच्या पॅन्टचे बटन उघडे ठेवले याकडे होते. तर अनेकांनी तिला यावरून ट्रोल देखील केले आहे.

आणखी वाचा : प्रियांका अमेरिकावासियांना खाऊ घालतेय ‘मुंबईचा वडापाव’, किंमत ऐकून पळून जाईल भूक

 

View this post on Instagram

 

A post shared by Krishna Jackie Shroff (@kishushroff)

आणखी वाचा : पॉर्न चित्रपटाच्या ६ तासांच्या चित्रीकरणासाठी ‘नॅंसी भाभी’ घ्यायची इतके रुपये; कमाईचा आकडा ऐकून व्हाल थक्क

काही दिवसांपूर्वी तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये कृष्णा टॉपलेस असल्याने काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले होते. कृष्णाने हे फोटोशूट एच अँड एच या मॅग्झिनसाठी केले होते. हे फोटो या ऑगस्ट महिन्यात प्रकाशित होणाऱ्या मॅग्झिन कव्हरसाठी होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Krishna shroff shares her bold photo from her latest photoshoot dcp

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या