चित्रपट दिग्दर्शक ओम राऊत यांचा ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा सुपरहिट ठरल्यानंतर त्यांचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेता सैफ अली खान रावणाची भूमिका साकारणार आहे. आता या चित्रपटात कोणती अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार अशा चर्चा रंगल्या होता.

‘आदिपुरुष’ या चित्रपट अभिनेत्री क्रिती सेनॉन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच अभिनेता सनी सिंह देखील चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याचे समोर आले आहे. चित्रपटात प्रभास, सैफ आणि क्रितीला एकत्र पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत.

आणखी वाचा: लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण? दिसणार प्रभाससोबत ‘या’ चित्रपटात?

क्रितीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सैफ आणि प्रभाससोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने ‘नव्या प्रवासाला सुरुवात’ असे कॅप्शन दिले आहे.

काही दिवसांपूर्वी ओम राऊत यांनी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. हा चित्रपट श्रीरामचंद्रावर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. चित्रपटात प्रभास प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे तर सैफ रावणाची भूमिका साकारणार आहे. तसेच हा चित्रपट 3D अॅक्शन ड्रामा प्रकारात मोडणारा असून भूषण कुमार याची निर्मिती करत आहेत. २०२२ मध्ये हा चित्रपट प्रेक्षाकांच्या भेटीला येणार आहे. हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.