अर्वाच्च्य शब्दांत टीका करणाऱ्या भैरवी गोस्वामीला क्रितीचं सडेतोड उत्तर

‘कोण ही भैरवी गोस्वामी?’

kriti sanon
अभिनेत्री क्रिती सनॉन

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री भैरवी गोस्वामीनं क्रिती सनॉनवर अर्वाच्च्य शब्दांत टीका केली होती. क्रितीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. अनिल कपूर आणि अर्जुन कपूर यांच्या ‘मुबारका’ चित्रपटातील एका गाण्यावर नाचतानाचा हा व्हिडिओ होता. क्रितीच्या या व्हिडिओवर भैरवीनं अर्वाच्च शब्दांत टीका केली होती. भैरवीच्या टीकेला आता क्रितीने सडेतोड उत्तर दिलंय.

‘क्रिती वेड्यासारखी वागतेय आणि ती अभिनेत्री झाली तरी कशी हा प्रश्न मला पडतोय. कॉलेजचे विद्यार्थी तरी हिच्यापेक्षा चांगले दिसतात,’ असं भैरवीने म्हटलं होतं. यासोबतच तिने काही अर्वाच्च्य शब्दही वापरले होते. मुंबईत झालेल्या एका पत्रकार परिषदेदरम्यान क्रितीने या टिकेवर प्रतिक्रिया दिली. ‘कोण ही भैरवी गोस्वामी?’ असा प्रश्न विचारत ती पुढे म्हणाली की, ‘मी तिच्यासाठी खूष आहे. कारण आता तिला खूप प्रसिद्धी मिळाली आहे. आता तुम्हालाही तिचं नाव कळलंय. त्यामुळे ठीक आहे.’

PHOTOS : अंतराळवीर होण्यासाठी सुशांतची तयारी सुरु

मोजक्या शब्दांत क्रितीने भैरवीला सडेतोड उत्तर दिलं असं म्हणायला हरकत नाही. ‘भेजा फ्राय’, ‘हेट स्टोरी’ यांसारख्या चित्रपटात भैरवीने भूमिका साकारली. बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण करण्यात अपयशी ठरलेल्या भैरवीने केलेल्या टीकेनंतर नेटीझन्सनी क्रितीची बाजू घेत तिच्याविरोधात अनेक कमेंट्स केले होते. त्याचप्रमाणे प्रसिद्धीसाठी भैरवीने अशा प्रकारची टिप्पणी केल्याचीही चर्चा होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kriti sanon gave answer to hate story actress bhairavi goswami on her criticism

ताज्या बातम्या