scorecardresearch

“स्टुडंट ऑफ द इयर मधून पदार्पण केलं असतं पण…” कॉफी विथ करणच्या मंचावार केला क्रिती सेनॉनने खुलासा

टायगर आणि क्रिती हे दोघे सर्वप्रथम ‘हिरोपंती’ या चित्रपटात झळकले होते.

“स्टुडंट ऑफ द इयर मधून पदार्पण केलं असतं पण…” कॉफी विथ करणच्या मंचावार केला क्रिती सेनॉनने खुलासा
क्रिती सेनॉन | Kriti-Sanon

करण जोहरचा कॉफी विथ करण हा टॉक शो सध्या चांगलाच गाजतो आहे. वेगवेगळे बॉलिवूड सेलिब्रिटी यांनी या शोमध्ये हजेरी लावली आहे. कित्येकांनी त्यांच्या किंवा इतरांच्या आयुष्यातली गुपितंदेखील उघड केली आहेत. सारा अली खान, जान्हवी कपूर, समांथापासून सिद्धार्थ मल्होत्रा, विकी कौशल अशा बड्याबड्या स्टार्सनी या सीझनमध्ये हजेरी लावली होती. कॉफी विथ करणच्या ७ व्या सीझनचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

या नव्या भागात अभिनेत्री क्रिती सेनॉन आणि अभिनेता टायगर श्रॉफ आपल्याला बघायला मिळणार आहे. या टीझरमध्ये या दोघांनी भरपूर मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत त्यामुळे हा पूर्ण भाग बघण्यासाठी चाहते फारच उत्सुक आहेत. या भागात क्रिती ने एका वेगळ्याच गोष्टीचा खुलासा केला आहे. क्रीती म्हणते की, “मी सर्वात कुठली पहिली ऑडिशन दिली असेल तर ती ‘स्टुडंट ऑफ द इयर’साठी.”

पुढे क्रिती म्हणते की, “या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेसाठी मी ऑडिशन दिली होती. तेव्हा मला बहारा या गाण्यावर नाच करण्यास सांगितलं होतं, शिवाय ‘वेक अप सिड’ चित्रपटातले काही सीन्सदेखील दिले होते. पण यापैकी मी काहीच धड करत नव्हते. आणि यामुळेच माझं त्या चित्रपटासाठी सिलेक्शन झालं नाही. अर्थात ती भूमिका आलियाकडे गेली म्हणून मी तिच्या बाबतीत आकस बाळगणार नाही.”

आणखी वाचा : “तुला लेडी आमिर खान म्हणू का?” क्रिती सेनॉन म्हणते, “माझ्यावर इतका दबाव…”

क्रिती सध्या चित्रपटसृष्टीतील उत्तम आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. येणाऱ्या काळात ती टायगरबरोबर ‘गणपत’ या चित्रपटात आपल्याला दिसणार आहे. टायगर आणि क्रिती हे दोघे सर्वप्रथम ‘हिरोपंती’ या चित्रपटात झळकले होते. कॉफी विथ करण हा शो तुम्ही हॉटस्टार या प्लॅटफॉर्मवर बघू शकता. येत्या १ सप्टेंबर रोजी टायगर आणि क्रितीचा हा नवीन भाग प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kriti sanon says on the koffee with karan episode that she auditioned for student of the year avn