क्रिती सेननला करावा लागला बॉडी शेमिंगचा सामना, नेटकरी म्हणाले, “ही तर वरपासून खालपर्यंत…”

क्रितीने शेअऱ केलेल्या वर्कआऊट व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत.

kriti sanon-workout
(Photo-instagram"kritisanon)

बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींना त्यांच्या ग्लॅमरस अंदाजासाठी मोठी पसंती मिळताना दिसते. तर अनेकदा या अभिनेत्रींना त्यांच्या कपड्यांमुळे किंवा मेकअपमुळे ट्रोल व्हावं लागतं. आजवर बऱ्याच अभिनेत्रींना बॉडी शेमिंगचा सामनाही करावा लागला आहे. नुकतच अभिनेत्री क्रिती सेननला बॉडी शेमिंगला सामोरं जावं लागलंय.

क्रिती सेनेन फिटनेसकडे कायम लक्ष देताना दिसते. अनेकदा ती तिचे वर्कआऊटचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच क्रितीने एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. यात क्रिती तिच्या ट्रेनरच्या मदतीने वर्कआऊट करताना दिसतेय. मात्र या व्हि़डीओवर काही नेटकऱ्यांनी कमेंट करत तिला ट्रोल केलंय.

क्रिती सेननने यापूर्वी देखील वर्कआऊटचे अनेक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओत क्रिती पाठिचा व्यायाम करताना दिसतेय. या व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी तिचं कौतुक केलंय. तर काही नेटकऱ्यांनी मात्र अगदी खालच्या पातळीवर जाऊन कमेंट केल्या आहेत.

क्रितीच्या व्हिडीओवर कमेंट करत एक युजर म्हणाला, “आधीच इतकी सडपातळ आहेस आता कमरेचं हाडं तोडून घेशील.” तर दुसरा युजर म्हणाला, “वरपासून खालपर्यंत एकदम सपाट.” क्रिती सेनेनच्या व्हिडीओवर अनेकांनी ती खूपच सडपातळ दिसत असल्याच्या कमेंट केल्या आहेत.

(Photo-instagram’kritisanon)

या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, “बस कर ताई यानंतर मरण्याची कॅटेगरी सुरु होते.ज्याप्रमाणे तू वजन कमी करतेयस अगदी माचिसची कांडी बनली आहेस.” क्रितीच्या या व्हिडीओवर काही नेटकऱ्यांनी पातळी सोडून कमेंट केल्या आहेत.

एखादा फोटो असो किंवा व्हिडीओ अनेक सेलिब्रिटींना सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केलं जातं. काही सेलिब्रिटी या ट्रोलर्सकडे कायम दूर्लक्ष करतात तर अनेकजण नेटकऱ्यांना उत्तर देत त्यांची बोलती बंद करत असतात.
क्रिती सेनन लवकरच गणपत, आदीपुरुष आणि भेडीया या सिनेमातून झळकणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kriti senon face body shaming on workout video kpw

Next Story
Kaali Poster Row : “तुम्हाला हिंदू धर्माची…”, ‘काली’ पोस्टर वादानंतर स्वरा भास्करचे ट्वीट चर्चेत
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी