scorecardresearch

“सलमान खान माझ्या मोठ्या भावासारखा…”, केआरकेचे ‘ते’ ट्वीट चर्चेत

अनेकदा तो सलमानचे नाव न घेता त्याच्यावर निशाणा साधत असतो.

बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान हा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो सोशल मीडियावर नेहमीच त्याचे मत मोकळेपणाने मांडताना दिसतो. नुकतंच त्याने सलमान खानबद्दल एक ट्वीट पोस्ट केले आहे. मात्र यात त्याने कोणतीही वादग्रस्त टीका न करता त्याचे कौतुक केले आहे. यामुळे सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का बसला आहे.

केआरके आणि बॉलिवूडचा भाईजान सलमान खान यांच्यात सतत काही ना काही कारणांमुळे वाद सुरु असतात. बऱ्याचदा केआरके सोशल मीडियावर सलमान खान विरोधात पोस्ट शेअर करत असतो. अनेकदा तो सलमानचे नाव न घेता त्याच्यावर निशाणा साधत असतो.

काही दिवसांपूर्वी केआरकेने एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये खोटे सिक्स पॅक अॅब्स दिसत आहे. ती व्यक्ती ते खोटे सिक्स पॅक अॅब्स कसे वापरतात ते दाखवते. व्हिडीओ शेअर करत केआरके म्हणाला, “तुम्ही मला सांगू शकता का की बॉलीवूडमध्ये हे खोटे सिक्स पॅक अॅब्स कोण वापरत?” त्याच्या या प्रश्नावर अनेक नेटकऱ्यांनी सलमान खानचे नाव लिहिले होते. दरम्यान त्याच्या या ट्वीटनंतर त्याला मोठ्या वादाला सामोरे जावे लागले होते. यानंतर एका नव्या ट्विटद्वारे केआरकेने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

‘बुट्टा बम्मा’ गाण्यामुळे चर्चेत आलेला अल्लू अर्जुनचा ‘तो’ चित्रपटही हिंदीत येणार; प्रदर्शनाची तारीखही ठरली

केआरकेने ट्वीट करत म्हणाला की, ‘मी मीडियाला विनंती करतो की, माझे सर्व ट्विट सलमान खानसोबत लिंक करू नका. आमच्यात काही गैरसमज नक्कीच आहेत. पण तो मला माझ्या मोठ्या भावासारखा आहे. मी त्याचा शत्रू नाही आणि मी त्याचा द्वेषही करत नाही. माझे प्रत्येक ट्विट हे फक्त त्याच्यासाठी नसते. सिनेसृष्टीत इतर अनेक कलाकार आहेत ज्यांच्याबद्दलही मी ट्विट करतो. दरम्यान काही दिवसांपूर्वी सलमान खानने कमाल रशीद खानवर मानहानीचा दावा केला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Krk calls salman khan big brother months after defamation suit we might be having little misunderstanding nrp

ताज्या बातम्या