“सिद्धार्थ मल्होत्राची गर्लफ्रेंड असेपर्यंत कियाराचा एकही सिनेमा हिट होणार नाही”; केआरकेची भविष्यवाणी

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.

krk-tweet-shershah

बॉलिवूड कलाकारांवर टीका करणं आणि कलाकारांविषयी वेगवेगळी भाकीतं यात केआरकेचा हातखंडा आहे. स्वतःला सिने समीक्षक म्हणणारा केआरके कायमच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांवर वादग्रस्त वक्तव्य करताना दिसतो. या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्याला अनेकदा  सोशल मीडियावर ट्रोल देखील व्हावं लागलं आहे. आता केआरकेने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा आडवाणी बद्दल एक वक्तव्य केलंय. त्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आलाय.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. दोघांनी देखील याबद्दलची अधिकृत घोषणा अद्याप केली नसली तरी सोशल मीडियावर चर्चांना चांगलंच उधाण आलंय. दोघांच्या नात्यावरंच आता केआरकेने त्याची प्रतिक्रिया दिली आहे. केआरकेने एक ट्विट शेअर केलं आहे. यात तो म्हणाला, “सिद्धार्थ मल्होत्राची गर्लफ्रेंड असेपर्यंत कियारा आडवाणीचा एकही सिनेमा हिट होणार नाही” केआरकेने याआधी देखील अनेक कलाकारांबद्दल अशी भाकितं केली आहेत.

याआधी केआरकेने रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल भाकीत केलं होतं. यामध्ये 2022 सालामध्ये आलिया आणि रणबीर लग्न बंधनात अडकतील असं तो म्हणाला होता. मात्र लग्नानंतर 15 वर्षाच्या आतच रणबीर आलियाला घटस्फोट होईल, असं खळबळजनक वक्तव्य केआरकेने केलं होतं.

दरम्यान सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणीच्या ‘शेरशहा’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळताना दिसते. धर्मा प्रोडक्शन आणि काश एंटरटेनमेंट ने ‘शेरशहा’ या सिनेमाची निर्मिती केली असून 12 ऑगस्टला हा सिनेमा रिलीज होतोय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Krk new prediction said kiyara aadwani no film will hit till she is girlfriend of sidharth mhalotra kpw