scorecardresearch

“मुस्लिमांनी प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेला मतं द्यायला हवीत, ओवेसी आणि आझमी…”; केआरकेचं ट्वीट चर्चेत

केआरकेचे हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे.

बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान हा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. केआरके सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केआरके कोणत्या ना कोणत्या सेलिब्रिटीला ट्रोल करताना दिसतो. मात्र, यावेळी केआरकेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत महाराष्ट्रातील मुस्लिमांनी आभारी असलं पाहिजे की त्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. केआरकेने केलेली ही एक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

केआरकेने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. “महाराष्ट्रातील मुस्लिमांनी आभारी असलं पाहिजे की त्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. यामुळेच ते सन्मानाने जीवन जगत आहेत. सर्व मुस्लिमांनी प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेला मतं द्यायला हवीत आणि भाजपाचे एजेंट असलेल्या ओवेसी आणि आझमी यांना मतं देऊ नयेत,” असे ट्वीट केआरकेने केले आहे.

आणखी वाचा : “तू तर रोजा पाळत नाही किमान मुलांना तरी…”, रमजानच्या महिन्यात हॉटेलमध्ये गेल्यामुळे नेटकऱ्यांनी केले ट्रोल

आणखी वाचा : महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रस्थान असलेला शरद पवार यांचा ‘सिल्व्हर ओक’ बंगला आतून कसा दिसतो, पाहा फोटो

मागील काही दिवसांपासून संपूर्ण देशात रामनवमीनिमित्ताने सुरु असलेल्या हिंसक प्रकरणारवर केआरकेने हे ट्वीट केल्याचे म्हटले आहे. तर, महाराष्ट्रातील शेजारी असलेल्या झारखंड या राज्यात अशीच घटना घडली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Krk says muslims of maharashtra should be thankful that their cm is uddhav thackeray dcp

ताज्या बातम्या