बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असलेला ‘ब्रह्मास्र’ चित्रपट ट्रेलरपासूनच बॉयकॉट ट्रेण्डमध्ये अडकला होता. परंतु, असं असलं तरीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने देशात २१२.४४ कोटींची कमाई केली आहे. तर वर्ल्ड वाइड १० दिवसांत ३६० कोटींचा गल्ला जमवला आहे. ‘ब्रह्मास्र’चे बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे पाहून कमाल राशिद खान (केआरके)ने ट्वीट करत टीका केली आहे.

केआरकेने ट्वीट करत ‘ब्रह्मास्र’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरून बॉलिवूडची खिल्ली उडवली आहे. त्याने ट्वीटमध्ये “’ब्रह्मास्र’चे शो पाहण्यासाठी चित्रपटगृहांत प्रेक्षक नसले तरीही चित्रपट चांगली कमाई करत आहे. कारण, मंगळ आणि गुरू या ग्रहांवरील एलियन्स चित्रपट पाहण्यासाठी येत आहेत. परंतु, दुर्दैवाने चित्रपटगृहांत बसलेले एलियन्स प्रेक्षक पाहू शकत नाहीत”, असं म्हटलं आहे.

हेही वाचा >> “मी सलमान खानकडून…”, ‘बिग बॉस’ शोचे सूत्रसंचालन करण्याबाबत नागार्जुन यांचा खुलासा

केआरकेने याआधीही ‘ब्रह्मास्र’ चित्रपटावरून बॉलिवूडवर निशाणा साधला होता. “’ब्रह्मास्र’ चित्रपटाचे परिक्षण मी केलेलं नाही. तरीही प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात जात नाही आहेत. चित्रपटाच्या अपयशासाठी आता करण जोहर आणि बॉलिवूडमधील इतर लोक मला दोष देणार नाहीत, अशी अपेक्षा आहे”, असं ट्वीट त्याने केलं होतं.

हेही वाचा >> चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थिनींच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणावर सोनू सूदची प्रतिक्रिया, म्हणाला “अतिशय दुर्दैवी…”

केआरके कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी त्याने राजकारणात येण्याची इच्छा व्यक्त केली होती. तर एका ट्वीटमध्ये त्याने आरएसएसला माझी गरज असल्यास मी सहभागी होण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं होतं. यामध्ये त्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना टॅगही केलं होतं.