२७५ कोटींचा देशी सुपरहिरो

भारतीय सुपरहिरो ‘क्रिश ३’ ने तिकीटबारीवर चांगलीच झेप घेतली आहे. दिवाळीच्या एक दिवस आधी प्रदर्शित होऊनही अगदी पहिल्या दिवसापासून कमाईचा आकडा चढा ठेवणारा राकेश रोशन दिग्दर्शित ‘क्रिश

भारतीय सुपरहिरो ‘क्रिश ३’ ने तिकीटबारीवर चांगलीच झेप घेतली आहे. दिवाळीच्या एक दिवस आधी प्रदर्शित होऊनही अगदी पहिल्या दिवसापासून कमाईचा आकडा चढा ठेवणारा राकेश रोशन दिग्दर्शित ‘क्रिश ३’ तिसऱ्या आठवडय़ात ‘राम-लीला’ प्रदर्शित झाल्यामुळे थोडासा ढेपाळला आहे. मात्र, दोन आठवडय़ातच सुपरहिरोच्या वेगाने सुसाट सुटलेल्या या चित्रपटाने देशात २३५ कोटी आणि परदेशातील कमाईचा आकडा धरून एकू ण २७५ कोटींची दणदणीत रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. ‘चेन्नई एक्स्प्रेस’ आणि ‘थ्री इडियट्स’चे सगळे विक्रम मोडून ‘क्रिश ३’ हा सुपरडुपर हिट चित्रपट म्हणून नोंद झाला आहे.
एकाच दिवशी सर्वाधिक कमाई, दहा दिवसांत २०० कोटी आणि ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘थ्री इडियट्स’चे सगळे विक्रम मोडीत काढत २७५ कोटी असे नवनवे विक्रम ‘क्रिश ३’ने नोंदवले आहेत. तिसऱ्या आठवडय़ात मात्र संजय लीला भन्साळीच्या ‘राम-लीला’ने ‘क्रिश ३’ ची चढाई चांगलीच रोखली आहे. दोन आठवडे तिकीटबारीवर राज्य करणाऱ्या क्रिश ३ ची कमाई आता आठवडय़ागणिक कमी होत जाईल, असे ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांनी म्हटले आहे. ‘राम-लीला’ने परदेशात चांगलीच कमाई केली असून ‘क्रिश ३’ आणि ‘यह जवानी है दिवानी’चे रेकॉर्ड मोडले आहेत. ‘राम-लीला’ने परदेशात पहिल्याच आठवडय़ात २५.०४ कोटींची कमाई केली आहे. तर ‘क्रिश ३’ आणि ‘यह जवानी है दिवानी’ या दोन्ही चित्रपटांना अनुक्र मे २४.८६ कोटी आणि २२.१० कोटींची कमाई केली होती. मात्र, असे असले तरीही क्रिश ३ हा आत्ताचा सुपरडुपर हिट चित्रपट ठरला असल्याचे तरण आदर्श यांनी म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Krrish 3 buisness over 275 crores

ताज्या बातम्या