छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता शाहीर शेख सध्या यशाच्या शिखरावर आहे. तो नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतो. त्याच्या ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’या मालिकेच्या ३ ऱ्या सीजन प्रेक्षकांचे भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मात्र शाहीर सध्या वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. शाहीर त्याच्या इन्स्टाग्रामवर सक्रिय नसला तरी तो त्याच्या फॅन्सना नेहमीच त्याच्या कामा बद्दलची महिती देत असतो. शाहीरने नुकताच त्याच्या एका जुन्या मालिकेच्या दरम्यानचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
शाहीरने त्याच्या इन्स्टाग्रामवर ‘बेस्ट ऑफ लक निक्की’या लोकप्रिय मालिकेतील एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. त्याचा हा फोटो चाहत्यांना प्रचंड आवडलेला दिसून येत आहे. हा फोटो शेअर करताच काही नेटकऱ्यांना ‘बचपन का प्यार’या व्हायरल गाण्याची आठवण झाली. यात शाहीरने शाळेतील मुलाचे कपडे परिधान केले असून या फोटोत तो आरश्या समोर पोज देताना दिसत आहे. याला त्याने “बेस्ट ऑफ लक निक्की २०११ डिस्ने इंडिया #madme #शाहीरशेख”असे कॅप्शन दिले आहे.
View this post on Instagram
शाहीरने शेअर केलेल्या या थ्रोबॅक फोटोवर फॅन्स लाइक्सचा वर्षाव करताना दिसले. तसंच त्यांनी कमेंट करून आपली प्रतिक्रिया ही मांडली आहे. एका युजरने लिहिले की,”रितेशला मी मिस करतो.” दुसऱ्या फॅनने लिहिले की, “आम्ही अजूनही रितेशला मिस करतो.” शाहीर शेखने ‘बेस्ट ऑफ लक निक्की’मध्ये रितेशची भूमिका साकारली होती. त्याने शेअर केलेल्या फोटो बघितल्यावर फॅन्सना देखील त्याने साकारलेल्या पात्राची आठवण झाल्याचे दिसून आले आहे. फोटोमध्ये शाहीर तरुण दिसत असून हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
‘बेस्ट ऑफ लक निक्की’ ही मालिका २०११ ते २०१६ दरम्यान प्रसारित झाली होती. ही मालिका अमेरिकन मालिका ‘गुड लक चार्ली ‘च रीमेक व्हर्जन आहे. ही मालिका एक फॅमिलीची आहे. जी त्यांच्या ४थ्या मुलीच्या जन्मानंतर घर कसे सांभाळतात? काय काटकसरी कराव्या लागतात हे दाखवले आहे.