‘ती परत आलीये’ या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री कुंजिका काळविंट सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग असून ती अनेकदा तिच्या कामाचे अपडेट इन्स्टाग्रामवरून देत असते. आताही गणेशोत्सवाच्या आधी तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरलही झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुंजिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती गणेश मूर्ती तयार करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिने त्याला साजेसं कॅप्शनही दिलं आहे. तिने लिहिलं, “साध्या मातीला येणारं देवपण श्रध्देने जागृत होतं, त्या मूर्तीचं तेज म्हणजे प्रत्यक्ष मुर्तीकाराने कलेपोटी त्यात फुंकलेले प्राण! कलेचं सौंदर्य समृद्ध असतं त्यात आव नाही तर असतो तो निर्मळ भाव… दरवर्षी ख्यातनाम मूर्तिकार ‘मादुस्कर गणपती’कडून आमच्या घराची मूर्ती तयार होते. पण, यावर्षी ती घडवण्याचा प्रयत्न आपण करावा असं ‘मादुस्कर गणपती’चे गणेश मादुस्कर यांनी सुचवले आणि बाप्पाने ते प्रत्ययास आणून घेतलेच!”

आणखी वाचा- ‘ती परत आलीये’मधील कलाकारांचं एका भागाचं मानधन पाहून थक्क व्हाल; सर्वाधिक कमाई करणारी व्यक्ती आहे…

कुंजिकाने पुढे लिहिलं, “गणेश मादुस्कर यांच्या मार्गदर्शनाने मी हि मूर्ती घडवण्याचा प्रयत्न केला. पर्यावरणाची जाण ठेऊन इको-फ्रेंडली लाल मातीचा वापर केला आहे. त्याच्या साच्यांपासून, त्याच्या हात-पायाला आकार देणे, त्याच्या आसनासाठीचे सिंहासन, त्याच्या हातावरचा मोदक, त्याचे भावपूर्ण, तेजस्वी पण अतिशय प्रेमळ डोळे हे सगळं साकारताना आपल्या हातून देव घडतोय ह्याचं खूप अप्रूप वाटलं.”

आणखी वाचा- ती परत आलीये: कुंजिकाने सांगितला हॉरर मालिकेत काम करण्याचा अनुभव

दरम्यान कुंजिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी कुंजिकाचं कौतुक केलं आहे. कुंजिकाच्या या व्हिडीओवर कमेंट्स आणि लाइक्सचा अक्षरशः पाऊस पडला आहे. कुंजिकाच्या कामाबद्दल बोलायचं तर तिने ‘स्वामिनी’ मालिकेत खलनायकी भूमिका साकारली होती. पण तिला खरी ओळख ‘ती परत आलीये’ या मालिकेतून मिळाली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kunjika kalwint share video of making ganesh murti goes viral mrj
First published on: 03-08-2022 at 17:52 IST