scorecardresearch

“हे कमर्शियल आर्टिस्ट येतात अन् बक्षिसं घेऊन जातात…”, कुशल बद्रिकेने सांगितला सिद्धार्थ जाधवचा ‘तो’ किस्सा

एका पुरस्कार सोहळ्यात अभिनेता कुशल बद्रिकेने सिद्धार्थ जाधवची एक भावूक आठवण सांगितली आहे.

‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावरून घराघरांत लोकप्रिय झालेले नाव म्हणजे कुशल बद्रिके. विनोदाचा बादशाह, हुकमी एक्का अशी त्याची ओळख सांगितली जाते. कुशल बद्रिके हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. अनेकदा तो त्याच्या आगामी नाटकांची, चित्रपटांची माहिती सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतो. नुकतंच एका पुरस्कार सोहळ्यात अभिनेता कुशल बद्रिकेने सिद्धार्थ जाधवची एक भावूक आठवण सांगितली आहे.

झी मराठी वाहिनीवर ‘फिल्मफेअर अवॉर्ड मराठी २०२१’ या पुरस्कार सोहळ्याचे चित्रीकरण नुकतंच पार पडले. या कार्यक्रमात धुरळा चित्रपटासाठी सिद्धार्थ जाधवला उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. अभिनेत्री स्मिता जयकर आणि कुशल बद्रिकेच्या हस्ते त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारतेवेळी सिद्धार्थ प्रचंड भावूक झाला. सिद्धार्थ हा पुरस्कार स्वीकारत असताना कुशल बद्रिकेने त्याची एक जुनी आठवण यावेळी सांगितली. त्याने सर्वात आधी सिद्धार्थचे या पुरस्कारासाठी तोंडभरुन कौतुक केले.

“अरुंधतीच्या आईला त्रास देण्याचे सिन लिहू नकोस नाहीतर…”, ‘आई कुठे काय करते’मधील अनिरुद्धची पोस्ट चर्चेत

“मी जेव्हा सिनेसृष्टीत आलो तेव्हा त्याने मला मोलाची संधी मिळवून दिली होती. एकदा एका स्पर्धेत अचानक सिद्धू हे छोटं मोठं काम करत होतो. तेव्हा मी रंगभूमीवर काम करत होतो. त्यावेळी सिद्धार्थची एन्ट्री झाली होती. सिद्धार्थची एन्ट्री झाली तेव्हा मी म्हटलं होतं की हे साले कमर्शियल आर्टिस्ट येतात आणि बक्षिसं घेऊन जातात आणि त्यानंतर कसं कोण जाणे त्या स्पर्धेत सिद्धार्थचा द्वितीय क्रमांक आला होता आणि प्रथम क्रमांक माझा आला होता.”

“तेव्हा सिद्धार्थने नाटकामध्ये काम करशील का? असे विचारलं होतं. यानंतर माझं राम भरोसे हे पहिलं कमर्शिअल नाटक आलं होतं. तिथून माझा प्रवास सुरु झाला. आज या रंगमंचावर सिध्दार्थचा पहिला नंबर आला आणि ते चक्र आज पूर्ण झालं.” असे कुशल बद्रिके म्हणाला. दरम्यान हे सर्व बोलताना कुशल भावूक झाला. त्याला आपले अश्रू अनावर झालेले पाहायला मिळाले.

“तिचा होकार अन् १ एप्रिलचा तो दिवस…”, दिग्दर्शक केदार शिंदेंनी सांगितला लग्नापूर्वीचा मजेशीर किस्सा

या सर्वांवर प्रतिक्रिया देताना सिद्धार्थ जाधव म्हणाला की, “थँक्यू फिल्मफेअर मला असं वाटतं की स्वप्न पाहिली की ती पूर्ण होतात. ती पूर्ण होण्यासाठी असे मित्र लागतात. दरम्यान प्रथमच फिल्मफेअर हा पुरस्कार सोहळा मराठीमध्ये रंगणार असल्याने या सोहळ्याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.”

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kushal badrike gets emotional and talk about siddharth jadhav old days nrp

ताज्या बातम्या