मुसळधार पावसामुळे कुशाल टंडनचं लाखोंचं नुकसान; म्हणाला, “करोना काही कमी होता का…”

धो धो पावसाचा फटका सेलिब्रिटींना सुद्धा बसला. ‘बिग बॉस’ फेम कुशाल टंडनला पावसामुळे लाखोंचा फटका बसला असून त्याच्या रेस्तरॉंची अक्षरशः दुरावस्था झालीय.

Kushal Tandon restaurant, Kushal Tandon

गेले अनेक दिवस पडत असलेल्या धो धो पावसामुळे मुंबईकरांची संपूर्ण दैना उडाली. पावसाने अक्षरश: मुंबईसह कोकणात हाहाकार माजवला. या धो धो पावसाचा फटका सेलिब्रिटींना सुद्धा बसला. ‘बिग बॉस’ फेम कुशाल टंडनला पावसामुळे लाखोंचा फटका बसलाय. गेल्याच वर्षी मुंबईत त्याने एक रेस्तरॉं सुरू केलं होतं. मुसळधार पावसाने त्याच्या या नव्या कोऱ्या रेस्तरॉंची दुरावस्था केलीय. याचा एक व्हिडीओ शेअर करत त्याने झालेल्या नुकसानीची माहिती दिलीय.

टीव्ही अभिनेता कुशाल टंडन लाखो फॅन्सच्या मनावर राज्य करतोय. ‘बिग बॉस’मध्ये आल्यानंतर त्याच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली होती. कुशाल टंडनने गेल्याच वर्षी ‘अरबर २८’- ऑल डे किचन आणि बार’ या रेस्तरॉंचं लॉंचिंग केलं होतं. मात्र सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसाने त्याच्या या नवा कोऱ्या रेस्तरॉंवर पाणी फेरलंय.

‘बिग बॉस’ फेम कुशाल टंडनने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हा व्हिडीओ शेअर केलाय. सोबतच रेस्तरॉंचे काही फोटोज सुद्धा त्याने जोडले आहेत. रेस्तरॉंचा व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना त्याने आपल्या स्टाइलची एक कॅप्शन देखील लिहिलीय. “धन्यवाद, मुंबईच्या पावसा…माझ्या रेस्तरॉंची अशी अवस्था करण्यासाठी…यासाठी करोना कमी पडला होता ना…मग तू हे करून दाखवलंस…या कहाणीतील एक चांगली गोष्ट आहे की यात वॉचमनला आणि सिक्यूरिटी गार्डला कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही…”

Kushal-Tandon-Restaurant
(Photo: Instagram/therealkushaltandon)

‘बिग बॉस’ फेम कुशाल टंडनने गेल्याच वर्षी फेब्रूवारीमध्ये हे रेस्तरॉं लॉंच केलं होतं. यासाठी त्याने एक मोठी पार्टी देखील आयोजित केली होती. या पार्टीमध्ये अभिनेता सिद्धार्थ शुक्ला, निया शर्मा, क्रिस्टल डिसूजा, सोहेल खान, रवि दुबे, करणवीर बोहरा, सरगुन मेहता, कृतिका सेंगर, निकितन धीर हे सर्वच जण आले होते.

कुशालने सुरू केलेलं हे रेस्तरॉं करोना काळात हवं तसं चाललं नाही. लॉकडाउनमुळे त्याचं भरपूर नुकसान झालं होतं. यात आता मुसळधार पावसाने आणखी भर घालत लाखोंचं नुकसान झालंय. यात त्याचं जवळपास २० ते २५ लाखांचं नुकसान झालं असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.

कुशाल टंडनने ‘एक हजारों में मेरी बहना है’, ‘बेहद’, ‘बेरुखी’ सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलंय. त्यानंतर तो ‘बिग बॉस’ मध्ये देखील झळकला होता. बिग बॉसमध्ये त्याच्यासोबत गौहर खानसोबतची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली होती. हा शो संपल्यानंतर बराच काळ दोघे एकत्र होते. पण त्यानंतर या दोघांचा ब्रेक अप झाला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kushal tandon restaurant affected amid mumbai rains prp