आमिर खानला धक्का, ‘लाल सिंग चड्ढा’ प्रदर्शित होताच ऑनलाइन वेबसाइटवर झाला लीक

आमिरच्या अभिनयाचं कौतूक तर होतंय मात्र त्याला आता धक्का देखील बसणार आहे.

आमिर खानला धक्का, ‘लाल सिंग चड्ढा’ प्रदर्शित होताच ऑनलाइन वेबसाइटवर झाला लीक
एका मुलाखतीमध्ये आमिरने 'महाभारत' ग्रंथावर पौराणिक चित्रपट बनवण्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

आमिर खानचा चर्चेत असलेला लाल सिंग चड्ढा हा चित्रपट आज (११ ऑगस्ट) चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर हा चित्रपट सातत्याने वादात अडकल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटाबाबत लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. सिनेसृष्टीतील विविध कलाकार ते आमिरचे चाहते सर्वजण या चित्रपटाचे वर्णन ब्लॉकबस्टर म्हणून करत आहेत. एकीकडे या चित्रपटासाठी आमिरचे कौतुक होत असताना दुसरीकडे मात्र त्याला धक्का बसला आहे.

आमिरचा चित्रपट पाहण्यासाठी अनेकजण खूप उत्सुक आहेत. आमिर खानचा ड्रीम प्रोजेक्ट लाल सिंग चड्ढा प्रदर्शित झाल्यानंतर काही तासातच त्याला धक्का बदला आहे. हा चित्रपट ऑनलाइन वेबसाइटवर लीक झाल्याची माहिती समोर येत आहे.

“आपल्याच अर्थव्यवस्थेचं नुकसान आणि…” ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ ट्रेंडबाबत अक्षय कुमारचं स्पष्टीकरण

मिळालेल्या माहितीनुसार, आमिर खानचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट तमिल रॉकर्स, मूवी रुल्झ आणि अशा इतर अनेक पायरसी आधारित वेबसाइटवर लीक झाला आहे. हा चित्रपट टेलिग्रामवरही लीक झाल्याचे बोललं जात आहे. प्रदर्शनाच्या दिवशीच हा चित्रपट लीक झाल्यामुळे लाल सिंग चड्ढाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनला याचा निश्चितच फटका बसण्याची शक्यता आहे.

आमिर खानने त्याच्या चाहत्यांना त्याचा चित्रपट पाहण्याची विनंती केली आहे. मात्र चित्रपट लीक झाल्यामुळे याचा परिणाम चित्रपटाच्या कमाईवर होणार आहे. दरम्यान आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चा हिंदी रिमेक आहे. हॉलिवूड चित्रपटाचे हक्क मिळविण्यासाठी ८-९ वर्षे लागली, असा खुलासा नुकतंच आमिर खानने एका मुलाखतीत केला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“कुणालचा जन्म लंडनचा…” सोनाली कुलकर्णीने नवऱ्यासाठी घेतला हटके उखाणा
फोटो गॅलरी