Thalapathy Vijay TVK Election Results: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी आज संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. अवघ्या दीड वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या थलापती विजयच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाने १०६ जागांवर आघाडी मिळवत सत्ताधारी आणि विरोधकांना धूळ चारली आहे. योगायोगाने आज, ४ मे रोजी विजयची बेस्ट फ्रेंड अभिनेत्री त्रिशा कृष्णनचा वाढदिवस आहे. या दुहेरी आनंदाच्या निमित्ताने तेलुगू अभिनेत्री लक्ष्मी मंचू हिने केलेली सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. लक्ष्मीने त्रिशाला शुभेच्छा देताना म्हटले की, हा विजय म्हणजे तुझ्यासाठी विश्वाने दिलेले सर्वोत्तम वाढदिवसाचे गिफ्ट आहे. त्रिशा आज पहाटे तिरुपतीचे दर्शन घेऊन थेट विजयच्या घरी पोहोचली असतानाच लक्ष्मीच्या या पोस्टची चर्चा होत आहे.

तमिळनाडू विधानसभा निवडणूक निकालाची सर्वाधिक चर्चा होत आहे. थलपती विजयच्या टीव्हीके पक्षाने १०६ जागांवर आघाडी मिळवत बाजी मारली. दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी टीव्हीकेच्या यशाबद्दल पोस्ट केल्या आहेत. तेलुगू अभिनेत्री लक्ष्मी मंचूच्या पोस्टने लक्ष वेधून घेतले आहे.

आज (४ मे) अभिनेत्री त्रिशा कृष्णनचा वाढदिवस आहे. विशेष म्हणजे मागील अनेक महिन्यांपासून त्रिशा कृष्णन व विजय थलपती यांचं अफेअर असल्याच्या चर्चा होत आहेत. आज पहाटे त्रिशाने तिरुपतीमध्ये दर्शन घेतले आणि नंतर ती थेट थलपती विजयच्या चेन्नईतील घरी पोहोचली. अशातच तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लक्ष्मीने तमिळनाडूमध्ये टीव्हीकेने मिळवलेल्या यशाचा उल्लेख केला आहे.

पाहा लक्ष्मी मंचूने केलेली पोस्ट

“त्रिशा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! आजचा दिवस खास सेलिब्रेशनसाठी आहे. मला वाटतं की या अभूतपूर्व विजयाद्वारे युनिव्हर्सनेच तुला वाढदिवसाची सर्वोत्तम भेट देण्याचं ठरवलंय. आज तुझ्यासाठी हा डबल सेलिब्रेशनचा दिवस उत्सव आहे. डार्लिंग, तुझा आजचा दिवस अतिशय सुखद आणि अविस्मरणीय जावो!” अशी पोस्ट लक्ष्मी मंचूने केली आहे.

Lakshmi Manchu Post for Trisha Krishnan Birthday and Thalapathy Vijay TVK Win
लक्ष्मी मंचूने त्रिशाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; थलापती विजयच्या विजयाचा केला खास उल्लेख.

मागील अनेक महिन्यांपासून त्रिशा व विजयच्या नात्याबद्दल चर्चा सुरू आहेत. विजय व त्रिशाचं अफेअर असल्याचा आरोप करत थलपतीच्या पत्नीने घटस्फोट मागितला. अद्याप त्रिशा व विजयने त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. पण लक्ष्मी मंचूच्या या पोस्टने दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलंय, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.