scorecardresearch

बॉलिवूडचे ‘बुरे दिन’? आमिर, अक्षय, शाहरुख पाठोपाठ आता सलमान खानही संकटात, ‘बॉयकॉट टायगर ३’ चर्चेत

‘टायगर ३’ चित्रपटालाही आता बॉयकॉटचा सामना करावा लागत आहे.

बॉलिवूडचे ‘बुरे दिन’? आमिर, अक्षय, शाहरुख पाठोपाठ आता सलमान खानही संकटात, ‘बॉयकॉट टायगर ३’ चर्चेत
'टायगर ३' चित्रपटालाही आता बॉयकॉटचा सामना करावा लागत आहे.

‘बॉयकॉट’ हा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजत आहे. या ट्रेंडमुळे हिंदी चित्रपटांना मात्र मोठं नुकसान सहन करावं लागत आहे. आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’, अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ चित्रपटांकडे तर प्रेक्षकांनी पाठ फिरवली. या दोन्ही चित्रपटांना बॉयकॉट करा असं सतत सोशल मीडियावर बोललं जात होतं. त्यानंतर शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटालाही बॉयकॉटचा सामना कारावा लागत आहे. आता सलमान खान यामध्ये अडकला आहे.

आणखी वाचा – मराठी चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर चलती, आणखी एका धमाकेदार कलाकृतीची घोषणा, ‘त्या’ सहा जणींची रंगतेय चर्चा

सलमानने काही दिवसांपूर्वीच एक व्हिडीओ शेअर करत ‘टायगर ३’ चित्रपटाची घोषणा केली. हा चित्रपट पुढील वर्षी २१ एप्रिलला बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे. पण त्याचपूर्वी ‘बॉयकॉट टायगर ३’ हा नवा ट्रेंड सुरु झाला आहे. एकामागोमाग एक बिग बजेट हिंदी चित्रपटांबाबत नकारात्मक चर्चा रंगत आहे.

सलमानचे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतात. मात्र ‘टायगर ३’च्या बाबतीत सध्या काही वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. ‘टायगर ३’च्या पहिल्या दोन भागांना बॉक्स ऑफिसवर उत्तम प्रतिसाद मिळाला होता. आता मात्र या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाला प्रेक्षकांचा कितपत प्रतिसाद मिळणार याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अजूनही २०२३ची वाट पाहावी लागणार आहे.. पण त्यापूर्वीच टायगर ३ची नकारात्मक चर्चा सुरु झाली आहे.

नेटकऱ्यांनी ट्विटरद्वारे सलमानचे काही मीम्स शेअर करत हॅशटॅग बॉयकॉट टायगर ३ असं म्हटलं आहे.

आता यापुढेही प्रदर्शित होणाऱ्या हिंदी चित्रपटांना प्रेक्षक प्रतिसाद देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.